चंदगड (प्रतिनिधी) :
मुंबईमध्ये बालविकास विद्यामंदिर जोगेश्वरी पूर्व, सर्वोदय नगर येथील शाळेमध्ये दहावीला प्राजक्ता नाना मासरणकर हिने ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे शाळेमधून तसेच नातेवाईकमंडळी, ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत आहे. प्राजक्ता हिचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील वाळकुळी हे असून ती आपल्या घरच्यांसोबत मुंबईला रहायला होती. तसेच बालविकास शाळेमध्ये शिक्षण घेत होती. या मुंबईतील धावपळीच्या जीवनात अत्यंत मेहनत, जिद्द आणि सराव, अभ्यास केल्याने हे यश मिळाले अशी त्यांच्या पालकांकडून प्रतिक्रिया आली आहे. प्राजक्ताने मिळवलेल्या यशामुळे चंदगड तालुक्याचे नाव मुंबईसारख्या ठिकाणी एक उत्तम पायंडा घालण्यात यशस्वी ठरले.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
9049969625
No comments:
Post a Comment