चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड तालुक्यापासून काही अंतरावरील जोडलेल्या सर्वच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ये -जा होत असल्यामुळे लोकांचा तालुक्यापासून संपर्क तुटत आहे. नदीलगत शेतजमिनी, रस्त्याच्या कडेने असणारी शेत, ओढ्याच्या बाजूची शेती अशाप्रकारे सर्वच ठिकाणी पूराची अवस्था दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य लोकांप्रमाणे शेतकरीही धास्तावला आहें. चंदगड रोड लगत सर्व शेती पुराने व्यापली असून सर्व रस्ते, ओढे -नाले तुडुंब भरले असून येथील धोका वाढत चालला आहे. कोवाड बाजारपेठ, कानूर बाजारपेठ तसेच ईतर अन्य भाग, अनेक गावे ही पूरानी व्यापले असून चंदगड तालुक्यातील महापूरचा धोका वाढत चालला आहें. गेल्यावर्षीप्रमाने या वर्षीही महापूराची परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या लागलेल्या महापूराच्या विळखेपासून सर्व चंदगडवाशीयांनी काळजी घ्यावी तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशी सूचना केली गेली आहे.
No comments:
Post a Comment