गारगोटी (प्रतिनिधी) :
सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यासाठी शासनाने सोशल डिस्टनबाबत नियमावली जाहीर केली आहे. याचमुळे गर्दी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत तिरवडे-कुडतरवाडी (ता. भुदरगड) यांच्यावतीने गुरूवारी (दि. २७) रोजी होणार्या गणेश विसर्जन साठी नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. या दिवशी विसर्जन करण्यासाठी गल्लीवार करण्यात आलेले नियोजन पुढीलप्रमाणे : वरची गल्ली - दुपारी २ ते ३, सुतार व गुरव गल्ली - दुपारी ३ ते ४, पाटील गल्ली व मदारी अंबारी रोड - सायंकाळी ४ ते ५, मराठी शाळेपासून मेन रोड ते कट्टा व आंबेडकर नगर - सायंकाळी ५ ते ६ असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ज्या त्या गल्लीतील नागरिकांनी दिलेल्या वेळेचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625
No comments:
Post a Comment