Thursday, March 20, 2025

हारूर येथे विकासकामांचा शुभारंभ

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
ग्रुप-ग्रामपंचायत कानोली-हारूर (ता. आजरा) येथे 15 लाख रुपयाच्या निधीचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमच्या अध्यस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या, 25/15 योजनेतील विकास कामाचा शुभारंभ भाजप ओ बी. सी. सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी  यांच्या हस्ते झाले.  दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सुषमा पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले,आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आम्ही त्यांच्या माध्यमातून करीत आहोत. यापुढेही आमदार शिवाजीराव पाटील आणि अशोकआण्णा चराटी  यांचे सहकाऱ्यातून निधी देण्याचे आश्वासन दिले. स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिपाली सुतार, माया लोहार, यांच्यासह गजरगाव  सरपंच आनंदा कांबळे, सुरेश रेडेकर, विलास सुतार, मिलिंद पालकर, गणपती कळसकर, मारुती कदम, एम. टी. पाटील, प्रकाश पाटील, बाळासो चव्हाण, सयाजी सावंत संतोष सावंत, साहिल पाथरवट, दिलीप पाटील, दिनकर पाटील, राजू पाटील, गोपाळ भोगण, रावसाहेब पाटील, सी. ए. पाटील उपस्थित होते. आभार सुरेश रेडेकर यांनी मानले.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...