Friday, March 28, 2025

सात एप्रिलला आजरा वन विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व मागण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने 21 मार्च रोजी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील विविध मागण्यांबाबत वन विभागाकडून कांहीच प्रतिसाद न आल्याने सोमवारी ७ एप्रिलला मोर्चा काढून आजरा वन विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्धार आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

शुक्रवार (दि. 21) रोजी शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाने जाऊन आजरा वनविभाग परिक्षेत्र वनाधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनात ताबडतोबीने प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य वनसरंक्षक यांचे सोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक न झाल्यास मोर्चा काढून कार्यलयाला टाळे ठोकण्याची घोषणा केली होती. आठवडा उलटून गेला तरी वन विभागाकडून कांहीच प्रतिसाद न आल्याने आजरा येथील श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय करण्यात आला. शेतकरी आणि शेती बाबत जर वन विभाग असंवेदनशील असेल तर असले खाते हवेच कशाला अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्या. सोमवार सात एप्रिल रोजी सुलगाव फाटा येथे जमून सर्व मोर्चाने जाऊन आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयाला टाळे लावण्याचा निर्धार केला. यावेळी कॉ. संपत देसाई, संजय सावंत, राजू होलम, शांताराम पाटील, बाळू चौगले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, अशोक मालाव, प्रकाश शेटगे, युवराज जाधव, सहदेव प्रभू, भीमराव माधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...