Saturday, March 29, 2025

६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण अनावरण सोहळा संपन्न; साहित्य व संस्कृतीचा अभिजात उत्सव!

बेळगाव, विकास न्यूज नेटवर्क :
मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणाऱ्या ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ची तयारी जोरात सुरू झाली आहे. या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण मराठा मंदिर, बेळगाव येथे उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण गोपाळराव बिर्जे (अध्यक्ष, मराठा जागृती मंच, बेळगाव) आणि ईश्वर लगाडे (निवृत्त सिनिअर मॅनेजर, सिंडिकेट बँक) यांच्या हस्ते करण्यात आले. आप्पासाहेब गुरव, विश्वासराव घोरपडे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण आणि महादेव चौगुले यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यंदाच्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात साहित्यिक, ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन उद्योगपती आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलन आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "हे संमेलन केवळ साहित्याचा उत्सव नाही, तर मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा अभिजात महोत्सव आहे." यावेळी ईश्वर लगाडे, गोपाळ बिर्जे, महादेव चौगुले व आप्पासाहेब गुरव यांनी आपल्या मनोगतातून साहित्याच्या वाढत्या प्रभावावर आणि संमेलनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी सर्व साहित्यप्रेमींनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमास स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील, एम. वाय. जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे - पाटील  घाडी, शिवसंत संजय मोरे, मोहन अष्टेकर, मोहन पाटील, संजय गौंडाडकर, स्वप्निल जोगाणी, मनिषा नाडगौडा, रोशणी हुंद्रे, शितल पाटील, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, संजीवनी खंडागळे यांची उपस्थिती होती.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...