आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास नुकतेच राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून राज्य सरकारच्या हमीवर १२२.६८ कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. सदर कर्ज मंजूरी कामी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, नांगरतास ऊस संशोधन केंद्र येथे कारखान्याचे संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री ना. पवार व मंत्री ना. मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, उपाध्यक्ष सुभाष देसाई, केडीसीसी बॅंकेचे संचालक तथा बॅंक प्रतिनिधी सुधीर देसाई, जेष्ठ संचालक विष्णूपंत केसरकर, उदयदादा पोवार, मुकुंददादा देसाई, अनिल फडके, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशिलकर, गोविंद पाटील, रशिद पठाण, सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम व अधिकारी उपस्थित होते.
===============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment