गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडहिंग्लज आगाराला नवीन दहा बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पाच लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. या नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या गडहिंग्लज आगाराला नव्या पाच लालपरी बसेसचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गडहिंग्लज बसस्थानकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यासह उपस्थित प्रमुखानी नवीन लालपरी बसमधून सफर केली.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज आगाराला दहा नवीन लालपरी बसेस मंजूर झालेल्या आहेत. त्यापैकी पाच लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसेसचा उपयोग प्रवाशांच्या सेवेसाठी होऊन प्रवाशांची गैरसोय टळेल. आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून भविष्यात अधिक लालपरी बसेस आगाराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मंत्री असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचा आम्हाला निश्चितच फायदा होतो. आमच्या मतदारसंघातही त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच मिळू देत.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यानवार, माजी नगराध्यक्ष राजू खनगावे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, सतीश पाटील- गिजवणेकर, प्रकाशभाई पताडे, शर्मिली पोतदार, शारदा आजरी, रेश्मा कांबळे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, दीपक कुराडे, महेश गाढवी, अण्णासाहेब देवगोंडा, महादेवराव पाटील-धामणेकर, डॉ. बेळगुद्री, रफिक पटेल, हारून सय्यद, आगार व्यवस्थापक रेणे, संतोष कांबळे, आजी- माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment