Friday, March 21, 2025

मेडिकल असोसिएशन ऑफ आजराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजरा या आजरा तालुक्यातील नोंदणीकृत डॉक्टरांच्या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन “ EUPHORIA 2025 ” उत्साहात पार पडले. या स्नेहमेळाव्यामध्ये आजरा तालुक्यातील डॉक्टर्स आणि लहान मुला मुलींनी गाणी, नृत्य आणि विविध कलाविष्कार सादर केले .

गडहिंग्लज मधील नामांकित “देसाई हॉस्पिटल”चे डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई, डॉ. दिशा राणे-देसाई आणि डॉ. सुषमा देसाई या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दिपक सातोस्कर, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. प्रवीण निंबाळकर आणि डॉ. दिपक हरमळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. रोहित देसाई यांनी “उच्च रक्तदाब” आणि डॉ. दिशा देसाई यांनी “विविध नेत्रविकार आणि त्यावरील उपाय“ या विषयांवर सर्व डॉक्टर्सना मोलाचे मार्गदर्शन केले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि कौटुंबिक स्नेहमेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रामुख्याने डॉ. अनिल देशपांडे, डॉ. गौरी भोसले, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. सुरजीत पांडव , डॉ. रोहन जाधव आणि मेडिकल असोसिएशन मधील सर्वच सदस्यांनी आपले योगदान दिले. मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा ही संघटना नेहमीच अशा सामाजिक कार्यक्रमा सोबतच मोफत आरोग्य शिबिरे,  वृक्षारोपण आणि सांस्कृतिक घेत असते, त्यापैकीच हा एक वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. डॉ. भरत मोहिते आणि डॉ. गौरी भोसले यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन केले. मेडिकल असोसिएशन ऑफ आजराचे अध्यक्ष डॉ. प्रवीण निंबाळकर यांनी आभार मानले .
====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...