नांदेड (प्रतिनिधी) :
ओबीसी घटकातील बलुतेदारांचे आरक्षण व आव्हाने या विषयावर राज्यस्तरीय सकल विश्वकर्मीय सुतार समाज प्रतिनिधी व संघटकांनी ओबीसी चळवळीतील संघटनासह डिजिटल माध्यमातून आरक्षण परिसंवाद आयोजित केला होता. सामाजिक विकास व राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित असलेल्या ओबीसी समूहातील गावगाड्यातील बलुतेदार समाजाच्या विकासासाठी शासकीय धोरण राबविण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणात हस्तक्षेप होऊ नये व लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण मिळावे या विषयावर प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडले.
बैठकीस प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिनजी राजुरकर, ओबीसी विचारवंत प्रतापरावजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतजी गवळी यांनी सारथी, बार्टीच्या धर्तीवर महाज्योतीसाठी शासनाने घोषित केलेला निधी द्यावा व जेणेकरून बलुतेदार घटकांची शैक्षणिक व सामाजिक प्रगती साधता येईल या विषयावर आपले विचार व्यक्त केले. सामाजिक चळवळीतील साहित्यिक बाबा विश्वकर्मा यांनी समर्पक सूत्र संचालनातून महाराष्ट्रातील सर्व समाज प्रतिनिधींचा संवाद घडविला.
राज्यस्तरावरील आयोजित या परिसंवादात विश्वकर्मामय सुतार समाज महासंघाचे जेष्ठ नेतृत्व प्रदीपजी जानवे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक सर्वश्री दिलीपरावजी अकोटकर अमरावती, चंद्रकांतजी कांडेकरी (कोल्हापूर), प्रा. विजय रायमल (बुलढाणा), कैलाशजी मोरे (नाशिक), अशोकजी पगार (औरंगाबाद), अर्जुनजी सुतार (इचलकरंजी), शिवरामजी पांचाळ (नांदेड), सतीशजी शिंदे (बुलढाणा), संदीपजी दीक्षित (सातारा), श्रावणजी जाधव (पुणे), परागजी अहिरे (धुळे), विजयजी गवळी (धुळे) यांनी उपस्थित तालुका-जिल्हा प्रतिनिधीना ओबीसी चळवळीतील सहभाग व यापुढील दिशादर्शक कृतीसाठी सामाजिक विचारमंथन केले. सदरील बैठकीस राज्य समितीचे संघटक सतीशजी शिंदे यांनी पुढील निर्णायक कृतीसाठी लवकरच पुढील समिती बैठकीचे निर्देशन केले. परिसंवादाची प्रस्तावना बलुतेदार क्रांतीचे संयोजक अॅड. बाळासाहेब सुतार यांनी केले. सत्यप्रकाश अढवळकर यांनी परिसंवादात राज्य भरातून सहभागी मान्यवर, समाज बांधव व सामाजिक संस्था, संघटना प्रतिनिधींचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625