Thursday, September 17, 2020

कोल्हापूर शिवाजी पेठेतील ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील शिवाजी पेठ या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज कोविड उपचार केंद्र सुरु केले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान वैद्यकीय सेवेतील गेल्या ५-६ महिन्यात अनुभवास आलेल्या त्रुटी दूर करून हे कोविड उपचार केंद्र सुरु केले आहे.
ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे  अत्याधुनिक सुविधा आणि दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी प्रसिद्ध आहे. कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या आदर्श उपचार पद्धतीची काटेकोर पणे अमलबजावणी याठिकाणी केली जाते. त्याकरिता  सुसज्ज ICU वॉर्ड, ऑक्सिजन बेड ची उपलब्धता,  २४ तास डॉक्टर आणि आपुलकीने वागणारा नर्सिंग स्टाफ, पोषक आहार, रुग्ण आणि कुटुंबियांचे समुपदेशन यांसह इतर सेवांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी ८४५९३९०५२३ किंवा ९८९०६०८२६५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...