कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी आता तालुक्यापाठोपाठ कोल्हापूर शहरातही जनता कर्फ्यु व्हावा यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्त्वाखाली व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यासाठी आज (दि. 8) सायंकाळी इंजिनिअरींग असोशिएनच्या बैठकीत व्यापारी असोशिएशनची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत गुरुवार (दि. १०) पासून जनता कर्फ्यू पाळण्याबाबत एकमत होण्याची शक्यता आहे. किमान सात ते आठ दिवसाचा जनता कर्फ्यू असण्याची शक्यता आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment