राधानगरी (प्रतिनिधी) :
उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने योग्य पुनर्याचिका दाखल करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.यासाठी राज्य व केंद्र शासनाने प्रयत्न करावेत. या मागणीचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने सुशील पाटील कौलवकर यांनी राधानगरी तहसीलदारांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या साठ वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय झाला असून गुणवत्ता असूनही मराठा तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. सकल मराठा समाजास नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लाखोंचे मोर्चे काढून जोरदार मागणी केली. न्यायालयीन लढाईत मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य बाजू मांडली नसल्यामुळे समाजाला न्यायालयीन प्रक्रियेचा मोठा फटका बसला आहे. शासनाने या निर्णयाविरोधात पुनर्याचिका दाखल करून न्याय द्यावा. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत सर्व नोकर भरती बंद करावी. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करावी. नोकरीत आरक्षण मिळावे. कोल्हापूर जिल्ह्यात मराठा भवन बांधावे. आदी मागण्या निवेदनात नमूद केले आहेत.
यावेळी प्रा.विश्वास पाटील, प्रा.वसंत ढेरे, आर.के.पाटील, प्रा.नितीन जरंडीकर, संदीप पाटील, दिनकर चौगले, पंकज पाटील, मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625
No comments:
Post a Comment