महागाव (प्रतिनिधी) :
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण या चव्हाण कुटुंबातील सदस्यांना अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर याच्यां वतीने "कोविड -19 समाजरक्षक" या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला. या फाउंडेशनच्या वतीने देशभरातील 1200 हून अधिक कोरोना योद्धांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. ग्रामिण भागातील सामान्य व गरीब रुग्णांना आधारवड ठरणारे या हॉस्पिटलने कोविड -19 च्या पार्श्वभुमीवर गरीब रुग्णांच्या उपचारासाठी पुढे येऊन अविरतपणे रुग्णांची सेवा केली. या त्याच्या कार्याची दखल घेत अविष्कार फाउंडेशनच्या वतीने समाजरक्षक कोविड योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पिटलला यापुर्वी एन. ए. बी. एच. मानाकंन, स्कोच व सकाळ एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे. या महामारीच्या काळात समाजातील गरीब व वंचित रुग्णांना मदतीचा हात दिल्याबद्दल महागाव पंचक्रोशित चव्हाण कुटुंबीयाच्या कार्याचा गौरव होत आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment