कोल्हापूर (प्रतिनिधी) :
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय बुधवारी कोल्हापूर शहरातील गोलमेज परिषदेत घेण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा निर्धार हात उंचावून व्यक्त केला. मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवून समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाकडून मिळावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, आदी पंधरा ठराव आज येथील राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषदेत मंजूर झाले.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625
No comments:
Post a Comment