आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पाचशेकडे वाटचाल करित आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत वाढ होत आहे. यामुळेच प्रशासनाने आजरा तालुक्यात विनामास्क फिरणार्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तालुक्यात विनामास्क फिरणार्या व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड किंवा दंड न भरल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सर्व ग्रामसमित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी सोमवार (दि. ७) पासून करण्यात येणार आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment