महागाव (प्रतिनिधी) :
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निक व बी. टेक केंद्रांवर राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) सुरळीत पार पडली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. पहिल्यांदाच या विभागात राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा झाली.
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) महाराष्ट्रात परीक्षा 615 केंद्रावर रविवार (दि. 13) रोजी घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाच्या या केंद्रावर 900 विद्यार्थाची सोय करण्यात आली होती. त्यापैकी 700 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. कोणत्याही अडचणीविणा या केंद्रांवर परीक्षा सुरळीत झाली.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या व नँशनल टेस्टींग एजन्सीच्या नियम व आदेशानुसार या परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थाची पुरेपुर काळजी घेण्यात येत होती. अंतरनियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याबरोबर परीक्षा संपल्यानंतर गेटपर्यत सोडण्यात आले. त्याआधी विद्यार्थ्यांची थर्मल स्किनिंगने तपासणी करण्यात आली. एखाद्या विद्यार्थ्यांला अगदी काही मिनिटे उशीर झाल्यास त्यांना केंद्रावरील कर्मचारी सहकार्य करत होते. गाड्याच्या पार्किगंसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. परिक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस व खाजगी सिक्युरिटी गार्डना तैनात करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांच्या नियंत्रणाखाली परिक्षा सुरळीत पार पडली. याकामी प्रा. संतोष पोवार, प्रा.अमित देवकर, सचिन माटले, प्रा.राहूल देसाई, प्रा.अमरसिंह फराकटे, प्रा.शिवलिंग स्वामी, प्रा.विनायक घाटगे, मल्लीकार्जुन पाटील, प्रा.सुप्रिया राजाराम, प्रा.अमोल माने व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. एन.टी.ए.चे समन्वयक प्रा.कविता कुलकर्णी यांनी उत्कुष्ट परिक्षेच्या कामकाजाबद्दल विशेष कौतुक केले.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
9049969625
No comments:
Post a Comment