महागाव (प्रतिनिधी) :
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहातील पॉलिटेक्निक व बी. टेक. महाविद्यालयात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रांस टेस्ट (Neet) परिक्षेसाठी या केंद्रामध्ये विद्यार्थाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार (दि. 13 सप्टेंबर ) रोजी होणाऱ्या या परिक्षेसाठी 75 कक्षातून 900 विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. शासनाच्या व नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या आदेशानुसार कोवीड -19 च्या
पार्श्वभुमीवर विद्यार्थाच्या सुरक्षित वावर राखण्याबरोबरच सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे तसेच परिक्षेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यानी दिली आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment