आजरा (प्रतिनिधी) :
पेरणोली (ता. आजरा) येथील विठ्ठल मंदिरकडे जाणार्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. याचा निषेध म्हणून गावातील युवकांनी रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात बसून उपोषण केले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. आगामी काळात रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आत्मदहन करण्याचा इशारा वाघाचा चौक मंडळाचे अध्यक्ष संकेत सांवत यांनी दिला आहे. यावेळी दिनेश कांबळे, पांडूरंग पाईम, हरिबा कांबळे उपस्थित होते.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment