आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
सर्वसामान्यांच्या विकासाचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. यामुळे भाजपाने सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पुढील काळात आणखी विकास साधण्यासाठी भाजपाला साथ देऊन कमळ चिन्हावरील उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन भाजपा नेते अशोकअण्णा चराटी यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांच्या प्रचारार्थ देवर्डे व गवसे येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
चराटी पुढे म्हणाले, भाजपाची एकूण कार्यपद्धती पाहता लोकांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. याचे प्रतिबिंब जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालामध्ये दिसून येईल. तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच जागा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे या निवडणुकीत ज्या विष्णुपंत केसरकर व जयवंतराव शिंपी यांना घेऊन फिरत आहेत, ते केसरकर व शिंपी विधानसभेच्या वेळी कुठे होते?, असा सवालही त्यांनी केला. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार म्हणाले, कोणतेही पद नसताना तालुक्याच्या ग्रामीण भागात 50 कोटीहून अधिक निधी आणण्याचे काम केले. आगामी काळात देखील सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहू.
यावेळी स्मिता देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, दशरथ अमृते, बळवंत शिंत्रे, दीपक गवळी, विशाल आढाव, नामदेव बागडी, प्रभाकर बागडी, राजेंद्र पाटील, बाबुराव आढाव, शामराव तानवडे, संजय आढाव, संजय पाटील, ओमकार मळेकर, राजाराम गुरव, शिवाजी सोले, रवींद्र दिवेकर, सचिन पाटील, दिंगबर पाटील, रामचंद्र नेवगे, चंद्रकांत पाटील, सोपान वास्कर, संदेश मोहिते, निलकंठ यादव, आकाश कांबळे, गिरीश पाटील, आदिनाथ पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
No comments:
Post a Comment