Tuesday, January 27, 2026

सगळीकडे मीच म्हणणाऱ्यांनी आता तरी थांबले पाहिजे : अभिषेक शिंपी यांचा शिवसेना शिंदे गटाच्या आजरा येथील पत्रकार परिषदेत टोला


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
विरोधक गाजराची शेती करण्याचे काम करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत सोयीसाठी कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीचे शब्द देवून ठेवायचे आणि निवडणुका आल्या की मीच उमेदवार म्हणून पुढे यायचे अशी काही मंडळींची सवय आहे. सगळीकडे मीच म्हणणाऱ्यांनी आता तरी थांबले पाहिजे, असा सूचक टोला अभिषेक शिंपी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आजरा येथील पत्रकार परिषदेत लगावला.


स्वागत इंद्रजीत देसाई यांनी केले. शिवसेना शिंदे गटाचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विष्णुपंत केसरकर म्हणाले, मी जिथे जाईन तिथे गुलाल आहे. गत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांच्या साक्षीने जिल्हा परिषद उमेदवारीचा मला शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेलेला नाही. हा प्रकार म्हणजे लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरं नाही असा आहे. सुधीर देसाई यांना सर्वच सत्ता स्थानी आपल्याकडे ठेवायचे आहेत. निवडणुकीतील ऋणातून उतराई होण्याचा कोणताही प्रयत्न ते करत नाहीत. आगामी गोकुळ दुध संघ, जिल्हा बँक निवडणुकीसाठीच्या वेगळ्या पॅटर्नची मुहूर्तमेढ या निवडणुकीच्या माध्यमातून रोवली गेलेली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उत्तर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विठ्ठल उत्तूरकर, तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख विजय थोरवत, पंचायत समिती उमेदवार सतीश फडके, रणजीत सरदेसाई, बाळ केसरकर, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, राजू पोतणीस यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...