Monday, December 29, 2025

खेडेत मंगळवारी ॐ चैतन्य सद्‌गुरु भर्तरीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव, हरिपाठ वाटप कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
खेडे (ता. आजरा) येथे ॐ चैतन्य सद्‌गुरु भर्तरीनाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मंगळवार (दि. 30) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी वारकरी संप्रदायाला हरिपाठ वाटप करण्यात येणार आहे.

मंगळवारी पुण्यतिथी उत्सवामध्ये सकाळी 8 वाजता अभिषेक व पुष्पवृष्टी, दिंडी सोहळा, हरिपाठ वाटप व महाप्रसाद वाटप होणार आहे. ह. भ. प. अशोक गौराई दाजीबा तर्डेकर (मलिग्रे ता. आजरा) यांच्या संकल्पनेतून हरिपाठ वाटप करण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ॐ चैतन्य सद्गुरु भर्तरीनाथ महाराज मठ चॅरिटेबल ट्रस्ट खेडे यांनी केले आहे.
=============================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...