आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व समर्थ कॉलनीतील रहिवासी यांच्या वतीने समर्थ कॉलनीतील व आजरा शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांचे दालनात सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत समर्थ कॉलनीतील विजय पाटील यांच्या घराशेजारील वापरात नसलेला व्हॉल्व्ह काढून टाकण्याबाबत सूचना करण्यात आली असून ती तात्काळ मान्य करण्यात आली. समर्थ कॉलनीतील तांबे यांच्या घराशेजारील गटर पाईपमुळे निर्माण झालेल्या उंचवट्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले.
रवळनाथ कॉलनीतील नागरिकांना पाणी योग्य दाबाने मिळते की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार असून, आयडीयल कॉलनीतील बंद पडलेले विद्युत बल्ब बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. शहरातील काही भागात कचरा गाडी नियमित येत नसल्याची तक्रार करण्यात आली असता, उदाहरणार्थ शिवाजीनगर शासकीय गोदामाचे पुर्वे कडील भाग, रवळनाथ कॉलनी मधील पारपोलकर गल्ली कांही तांत्रिक अडचणीमुळे येत नव्हती यापुढे वेळेवर सेवा दिली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. आवंडी वसाहतीमध्ये अमोल कोले यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत या बाबत पाणीपुरवठ्याची तात्काळ पाहणी करून योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.
सध्या शहरात एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दररोज सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली. शहरातील नवीन पाणी पुरवठा चाचणीमुळे तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यानंतर समिती सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथे भेट देऊन आयडीयल कॉलनीतील रस्ते काम तातडीने पूर्ण करण्याबाबत तसेच समर्थ कॉलनीतील गटर समस्येवर योग्य तोडगा काढण्याबाबत संबंधित अधिकारी याना सुचित केले. या बैठकीस अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष व नगरसेवक परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, रामचंद्र पंडीत यांच्यासह समर्थ कॉलनीतील विजय मोहीते, बाळकृष्ण दरी, तुकाराम पवार, विनायक उफळकर, संजय सावंत, सुभाष कांबळे, पप्या शिंदे, अभिजीत मनगुतकर, आनंदराव पाटील, श्रीपती पाटील अमोल कोले इत्यादी नागरिक उपस्थित होते.
=========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment