Saturday, December 27, 2025

पालक पाद्यपुजनाने केंद्रशाळा पेरणोलीचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
शनिवारी कुरकुंदेश्वर यात्रेच्या पुर्वसंध्येच्या निमित्ताने  केंद्रशाळा विद्या मंदीर पेरणोली (ता. आजरा) शाळेत पहाटेच्या आल्हादमय वातावरणात शताद्बी महोत्सवाची पालक पाद्यपूजनाने उत्साहात सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जोशीलकर होते. प्रमुख पाहुणे उपसरपंच संकेत सावंत होते.

शाळेच्या मुलींच्या सुमधुर स्वागत गीताने व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजनाने व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे  उद्घाटन  करण्यात आले. मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शाळेचा सहभाग  व मान्यवरांचे स्वागत या विषयी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या स्वागता नंतर शताब्दी संयोजन समिती सदस्य संजय मोहिते यांनी शाळा शताब्दी महोत्सवात शाळेची, पालकांची, विद्यार्थी यांची भुमिका व सहभाग याविषयी मत मांडले व शताब्दी शुभारंभ झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर  सुजाण पालकत्व या विषयावर तानाजी पावले यांचे पालक प्रबोधनपर व्याख्यान झाले. त्यानंतर काॅ. संपत देसाई यांनी मराठी शाळा वाचवण्यासाठी पालकांची, समाजाची भुमिका, पेरणोली शाळेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात माजी शिक्षकांनी दिलेल्या संस्कार शिदोरीची आठवण करुन दिली. त्यानंतर उपस्थित पालक व मुलांचा पाद्य पुजन कार्यक्रम पडला. यावेळी महिला पालकांची उपस्थिती लक्षणिय होती.

कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शेतकरी संघटनेचे नेते तानाजी देसाई, विठ्ठल मस्कर, ग्रामपंचायत सदस्य संदिप नावलकर, सुषमा मोहिते, रुपाली पाईम, रणजित  फगरे, उदय कोडक, आदेश गुरव, पत्रकार कृष्णा सावंत, पवन कालेकर, मारुती  चांदेकर, अध्यापक धनाजी रावण, शिवाजी बोलके, नाईक मॅडम, नळकांडे मॅडम, शैलेश कांबळे, संभाजी कालेकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...