Friday, April 17, 2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा : आमदार अमल महाडिक


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेत पाणंद रस्त्यांचे आराखडे निश्चित करा, शासकीय जागेवरील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या हद्दी व सीमा निश्चित करुन तात्काळ अतिक्रमण हटवा त्याचबरोबर पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन असे वर्गीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समिती अध्यक्ष तथा आमदार अमल महाडिक यांनी दिल्या. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृह येथे पार पडली. या बैठकीस सदस्य सचिव प्रातांधिकारी मोसमी चौगुले, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर,  करवीर तहसिलदार स्वप्निल पवार, गटविकास अधिकारी डॉ. संदिप भंडारी, करवीर उपअधीक्षक भूमी अभिलेख किरण माने, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे,  जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता विलास तराळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले उपस्थित होते.
  
आमदार महाडिक म्हणाले, एका गावातून दुसऱ्या गावाला जोडणाऱ्या व गाव नकाशावर नोंद असलेल्या पाणंद रस्त्यांना प्राधान्याने खुली करणे, रस्ता मजबुतीकरण करणे अनुषंगाने ग्रामपंचायत यांच्याकडून पाणंद रस्ता मजबुतीकरणाबाबत आराखडे तात्काळ उपलब्ध करुन घेण्याबाबत समिती अध्यक्ष तथा आमदार अमल महाडिक यांनी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्थानिक स्तरावर  बैठक घेऊन  कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. ते म्हणाले, एकूण 25 कि.मी. याप्रमाणे क्लस्टर तयार करून त्याचे अंदाजपत्रक सादर करावा, जिल्हास्तरीय समितीकडून  प्रति कि.मी. दर निश्चित झाल्यानंतर विधानसभा क्षेत्रासाठी ठेकेदार यांचे पॅनल निश्चित करण्याबाबत कार्यवाही करावी, यासाठी आवश्यक असणारा निधीची माहिती सादर करण्याबाबत सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  त्याचबरोबर अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण विहित कार्यपद्धतीनुसार करुन योजनेसाठी CSR (Corporate Social Responsibility) निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी स्वतंत्र खाते सुरु करा व अभिसरणातून निधीची उपलब्धता करुन देण्याबाबत तसेच 5 प्रगतशील शेतकऱ्यांची नियुक्त या समितीवर करण्याबाबत सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या.
========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...