Thursday, July 30, 2020

आजरा शहरात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह


‌आजरा (प्रतिनिधी) :

गुरूवारी सायंकाळी आलेल्या अहवालात आजरा शहरातील आणखी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  अाले आहे. तर देवर्डे व हात्तिवडे येथीलही प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Wednesday, July 29, 2020

तुळशी-धामणी खोर्‍यात दुबार पेरणीचे संकट

तुळशी-धामणी खोर्‍यात दुबार पेरणीचे संकट

# नागली पिकांसह भात टोकणीची पिके फसली
# कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकरी आर्थिक अरिष्ठात
# पंचनामे करण्याची मागणी

 
खामकरवाडी (भाऊ खामकर) :

कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असताना राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. तर भात टोकणीची ही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा ) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.


 एकीकडे कोरोना सारख्या महाभयानक अशा रोगाचा सामना करताना सरकारसह स्थानिक दक्षता कमीट्या, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकरी ही जगण्याची धडपड करतो आहे. पण पावसाच्या लहरीपणाने त्याचे जगणे चांगलेच मेटाकुटीला आले आहे. कोरोनाशी दोन हात करताना विस्कटलेली आर्थीक घडी बसवण्याचा प्रयत्न करताना पदरमोड करून खरेदी केलेली बीयाने पावसाअभावी शेतातच वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आस्मानी संकट उभे ठाकले आहे. उसनवारी करून भात बीयाने खरेदी करून शेतीत टाकली. सुरवातीचा नक्षत्रात तेवढी वरून दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. पण पेरणी नंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली. इंजन, मोटारपंपाच्या सहायाने रोप लागण केली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून एकही पाऊस न लागल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लागण केलेल्या रोप लागणी बरोबर भात टोकण व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  मांडणी केलेली ही सर्वच पिके पावसा अभावी कोमेजून गेली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत आर्थिक अरिष्ठात सापडलेला शेतकरी पावसाच्या या लहरीपणामुळे आनखीनच संकटात सापडला आहे. सद्यातरी रोप लागण वगळता नाचणी, भात टोकण, मिरची, भुईमूग यासारखी पिके पूर्णतः वाळून बसली आहेत . कदाचीत येत्या नक्षत्रात चांगला पाऊस झालाच तर दुबार पेरणी करूनच शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतील. पण तेही पावसाच्या पाण्यावर तो कितपत लागेल हे सांगता येणार नाही. पण शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला हे नक्की. कृषी विभाग याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का ? असे प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.


बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.१२ टक्के; २७ शाळांचा निकाल शंभर टक्के


आजरा (प्रतिनिधी) :

कोरोनामुळे लांबलेला दहावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये आजरा तालुक्याचा ९९.१२ टक्के इतका निकाल लागला आहे. या परिक्षेसाठी तालुक्यातून १४८८ इतके विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४७५ इतके विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी तालुक्यातील ३२ पैकी तब्बल २७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थांचा भूगोलचा पेपर होऊ शकला नाही. तालुक्यात मुले पास होण्याचे प्रमाण ९८.८४ टक्के तर मुली पास होण्याचे प्रमाण ९९.४४ टक्के आहे.

तालुक्यातील शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे :

​व्यंकटराव हायस्कूल : ९९.०६
​आजरा हायस्कूल : १००
​पं. दीनदयाळ विद्यालय : १००
​शारदाबाई चव्हाण गर्ल्स हायस्कूल : १००
​रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूल : १००
​झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल : ८७.५०
​उत्तूर विद्यालय : १००
​वसंतरावदादा पाटील हायस्कूल उत्तूर : ९६.५५
​पार्वती शंकर हायस्कूल उत्तूर : १००
​पेरणोली हायस्कूल : ९७.४३
​मडिलगे हायस्कूल : १००
​भादवण हायस्कूल : १००
​आदर्श हायस्कूल शिरसंगी : ९७.२९
​आदर्श हायस्कूल गवसे : १००
​एरंडोळ हायस्कूल : १००
​चाफवडे हायस्कूल : १००
​रवळनाथ हायस्कूल देवर्डे : १००
​दाभिळ हायस्कूल : १००
​माऊली हायस्कूल धनगरमोळा : १००
​डायनॅमिक पब्लिक स्कूल सुळेरान : १००
​वाटंगी हायस्कूल : १००
​मलिग्रे हायस्कूल : १००
​आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी : १००
​केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी : १०० 
​महात्मा फुले हायस्कूल हात्तिवडे : १००
​आण्णासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड : १००
​राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे : १००
​माध्यमिक विद्यालय आरदाळ : १००
​ल. बा. चोरगे हायस्कूल बेलेवाडी : १००
​कर्मवीर विद्यालय चिमणे : १००
​भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी : १००
​छ. शिवाजी विद्यालय होन्याळी : १००


बातमी  व जाहिरात  क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

दहावीचा राज्याचा एकूण निकाल ९५.३० टक्के; यावर्षीही मुलींचीच बाजी


मुंबई (प्रतिनिधी) :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान, या mahahsscboard.maharashtra.gov.in,   mahresult.nic.inया अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे. तर यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली आहे.

यंदा एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहवीची परीक्षा दिली होती. यामध्ये विद्यार्थी – ९ लाख ७५ हजार ८९४, विद्यार्थिनी – ७ लाख ८९ हजार ८९४, तृतीयपंथी विद्यार्थी – ११०, अपंग विद्यार्थी – ९ हजार ४५ यांचा समावेश आहे. तर, संवेदनशील केंद्रांची संख्या ८० होती. १५ दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

यंदाही दहावीच्या परीक्षेत निकालात मुलींनीच बाजी मारली. मुलींचा एकूण निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के इतका लागला आहे. दरम्यान, निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात सर्वात कमी लागला आहे.

कोणत्या विभागाचा किती निकाल

कोकण – ९८.७७ टक्के

पुणे – ९७.३४ टक्के

नागपूर – ९३.८४ टक्के

औरंगाबाद – ९२ टक्के

मुंबई – ९६.७२ टक्के

कोल्हापूर – ९७.६४ टक्के

अमरावती – ९५.१४ टक्के

नाशिक – ९३.७३ टक्के

लातूर – ९३.०९ टक्के


विभागनिहाय विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे –

पुणे : २ लाख ८५ हजार ६४२ विद्यार्थी, नागपूर : १ लाख ८४ हजार ७९५ विद्यार्थी, औरंगाबाद : २ लाख १ हजार ५७२ विद्यार्थी, मुंबई : ३ लाख ९१ हजार ९९१ विद्यार्थी, कोल्हापूर : १ लाख ४३ हजार ५२४ विद्यार्थी, अमरावती : १ लाख ८८ हजार ७४ विद्यार्थी, नाशिक : २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी, लातूर : १ लाख १८ हजार २८८ विद्यार्थी, कोकण : ३५ हजार ६३७ विद्यार्थी.

कुठे पाहाल निकाल ?

mahresults.nic.in
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in

कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

गुणपडताळणीसाठी दुसऱ्या दिवशी अर्ज

ऑनलाइन निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरप्रत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अथवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्टदरम्य़ान अर्ज करता येणार आहे. तसंच छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही ३० जुलै ते १८ ऑगस्ट ही असेल.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

आजरा तालुक्यात आणखी चार कोरोनाबाधीत


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाचे आणखी चार कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११७ झाली. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये आजरा शहरातील ३७ वर्षीय पुरूष, भादवणमध्ये ६० वर्षीय महिला, चाफवडे येथील २७ वर्षीय युवक तर उत्तूर येथील ३६ वर्षीय युवकाचा समावेश आहे. आजरा शहरापाठोपाठ उत्तूर शहरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

Tuesday, July 28, 2020

आजरा शहरात कोरोनाचा पहिला बळी


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा शहरात मंगळवारी कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यापैकी ५८ वर्षीय व्यक्तीचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन चोवीस तासाच्या आतच कोरोनाचा शहरात पहिला बळी गेल्याने शहरवासियांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण तीन बळी झाले आहेत.


बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

दहावीचा निकाल उद्या बुधवारी जाहीर होणार




मुंबई (प्रतिनिधी) :

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा  निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा  निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

आजरा शहराला धक्क्याचे सत्र सुरूच; आणखी एक कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

सोमवारच्या रात्री उशिरा आलेल्या अहवालात कोेरोनाने आजरा शहरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. या अहवालात शहरातील चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ शहरातील आणखी एकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासात शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाच झाली आहे. सदर रुग्ण शहरानजिकच्या उपनगरातील आहे.


बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

धक्कादायक; अखेर आजरा शहरात कोरोनाचा शिरकाव, चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह


आजरा (प्रतिनिधी) :

गेले अनेक दिवस कोरोनापासून दुर असणार्‍या आजरा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी मध्यरात्री एकाचवेळी आजरा शहरातील चार जणांचे तसेच ग्रामीण भागातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. यामुळे आजरा शहरात खळबळ उडाली आहे. पाच अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ७०, ५८ व ४१ वर्षीय तीन पुरुष तर ६८ व ५२ वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

Sunday, July 26, 2020

बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्ग लवकर व्हावा; आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची मागणी


चंदगड (प्रतिनिधी) :

बेळगाव जिल्हाचे खासदार व देशाचे रेल्वे राज्यमंत्री ना. सुरेश अंगडी यांची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील निगडीत प्रश्न मांडले. बऱ्याच वर्षापूर्वी बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले होते, सदरचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात रखडलेले आहे तरी हा प्रस्ताव लवकर मार्गी लावावा, त्यामुळे हा रेल्वे मार्ग झाल्यास बेळगाव व चंदगड परिसरातील शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी ते खूप महत्वाचे ठरेल. तसेच कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, बेळगाव, धारवाड व हुबळी या रेल्वे मार्गाची  मागणी तत्कालीन खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी मांडली होती. याला अनसुरून आपण याला मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर, बेळगाव, धारवाड व हुबळी ही औद्योगिक केंद्रे  एकमेकांशी जोडली जातील.  येथे आधी पासून उद्योगधंदे एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे हा रेल्वे मार्ग झाला तर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

काही दिवसांपूर्वी दोन्ही राज्याच्या पाठबंधारे विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राकसकोप धरणामुळे होणाऱ्या जमिनीच्या नुकसानी बाबत व तिलारी धरणाच्या तीन रखडलेल्या बंधाऱ्यांच्या संदर्भात बैठक पार पडली होती. त्या अनुषंगाने तुडये, मळवी व परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई मिळावी व धरणातील गाळ काढावा अशी मागणी केली. तसेच तिलारी धरणाच्या तीन रखडलेल्या बंधाऱ्यांच्या संदर्भात बेळगाव येथे बेळगावचे  पालकमंत्री व पाठबांधरे मंत्री ना. रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके व आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, पालकमंत्री ना. सतेज पाटील, खासदर संजयदादा मंडलिक यांच्या समवेत बेळगाव येथे बैठक लवकर व्हावी अशी मागणी केली. तिलारी धरणातील रखडलेले तीन बंधारे लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण व कोल्हापूरचे खासदार संजयदादा मंडलिक मिळून केंद्र सरकारकडे मागणी करावी. दोन्ही राज्याच्या समन्वयातून ही धरणे पूर्ण करावी व धरणाचे पाणी चंदगड मधील सात ते आठ गावांना व मार्कंडेया नदीच्या माध्यमातून बेळगाव परिसरातील गावांना मिळावे अशी मागणीही आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी केली.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता; जाणून घ्या काय राहणार सुरु आणि काय राहणार बंदच!

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता;  जाणून घ्या काय राहणार सुरु आणि काय राहणार बंदच!


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २० जुलैपासून एक आठवडा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२७) लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. याबाबाबतचे आदेश आणि नियमावली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी सायंकाळी जाहीर केली. हे आदेश ३१ जुलै मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. 


हे सुरू होणार

गॅस वितरण  सकाळी नऊ ते सहा सुरु राहणार 

शासकीय आणि मालवाहतूक

माॅल्समध्ये जीवनावश्यक वस्तू आणि धान्य विक्री करता येणार  

पहाटे 6 ते सायंकाळी 6 पर्यंत दूध विक्री, भाजीपाला विक्रीस परवानगी

सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने, व्यवसाय,सर्व व्यापारी आस्थापना सुरू राहणार

शहरी व ग्रामीण भागातील उद्योगधंदे, एमआयडीसी 50 टक्के कामगारांसह सुरू राहणार

सर्व बँका, इन्शुरन्स कार्यालये सुरू राहणार

पेट्रोल-डिझेल पंप सुरू राहणार

सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवासी रिक्षा वाहतूक परवानगी

सर्व शासकीय कार्यालये

हे बंदच राहणार...

शॉपिंग मॉल्स,मार्केट, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, केश कर्तनालये, स्पा,ब्युटी पार्लर

हॉटेल,रेस्टॉरंट, लॉजिंग (क्वांरनटाईनसाठी तसेच वंदे मातरम योजनेंतर्गत घेतलेली हॉटेल, लॉज वगळता)

विवाह, साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदी तसेच सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम

सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक कामे वगळता संचारबंदी राहणार.

दुकाने तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये ६० वर्षावरील मालक, ग्राहक किंवा कर्मचारी म्हणून बाहेर पडता येणार नाही,  असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

बातमी व जाहिरात  क्षेत्रातील  विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Thursday, July 23, 2020

वडिलांच्या स्मृतीदिनी कोरोना योद्धांचा सत्कार; लक्ष्मण लोहार यांची सामाजिक जाणिव


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बाळासो लोहार यांनी आपले वडिल कै. बाळासो नामदेव लोहार (दादा) यांचा १० वा स्मृतीदिन सामाजिक उपक्रमाने साजरा केला. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या महामारीत निरपेक्ष भावनेने आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी काम करित आहेत. या कोरोना योद्धांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असाच गावातील कोरोना योद्धांचा वडिलांच्या स्मृतीदिनी गौरव करण्याचा निर्णय लक्ष्मण लोहार यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाला घरातील मंडळीनी पाठिंबा दिला. वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा लक्ष्मण यांनी पुढे सुरू ठेवला आहे. कोरोनाच्या महामारीतही आपल्या घरादाराचा विचार न करता राबणार्‍या हातांचा सन्मान करण्याचे काम लक्ष्मण लोहार यांनी केले. प्रयाग चिखली गावामध्ये कोरोना संकटकाळात काम करणार्‍या २१ आशा सेविका, १२ ग्रामपंचायत कर्मचारी, ७ आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका यांचा सन्मान लोकनियुक्त सरपंच उमा संभाजी पाटील, उपसरपंच अलका प्रभाकर पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, उत्पादन शुल्क खात्याचे निरिक्षक पी. आर. पाटील, दिलीप लोहार, मोहन लोहार, ग्रामसेवक बाजीराव इंगवले, तलाठी श्रीकांत नाईक, किशोर लोहार, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक उमा गुरव यांचाही सत्कार करण्यात आला. लक्ष्मण लोहार यांनी कोरोना काळात जपलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी लक्ष्मण लोहार, मोहन लोहार, दिलीप लोहार, किशोर लोहार, सुमन बाळासो लोहार, वासंती लोहार, शारदा लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 


बातमी  व जाहिरात  क्षेत्रातील  विश्वसनीय 
विकास डिजिटल  मिडीया 
7410168989

Wednesday, July 22, 2020

आजरा तालुक्याची शंभरी पार; बुधवारी तीन नवे कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात बुधवारी पुन्हा तिघे कोरोना पाॅझीटीव्ह सापडले आहेत. यापैकी किणे येथे आसामहून आलेले भारतीय सैन्य दलातील जवान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  कोळींद्रे येथे मुंबईहून आलेल्या दोघांचा अहवाल देखील पाॅझीटीव्ह आला आहे. यामुळे तालुक्याचा  कोरोना पाॅझीटीव्हचा आकडा पोहोचला 102 वर पोहचला आहे. 

Monday, July 20, 2020

प्रेम कथा एक - पैलू अनेक; इडियट बॉक्स एम एक्स एक्सक्लुसिवची नवीन वेबसिरीज या शुक्रवारी येतेय तुमच्या भेटीला

प्रेम कथा एक - पैलू अनेक
इडियट बॉक्स एम एक्स एक्सक्लुसिवची नवीन वेबसिरीज या शुक्रवारी येतेय तुमच्या भेटीला


विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :

'प्रेम' सहज आणि सोपं अस कधीच नव्हतं, एखादया व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे एक वेगळीच परीक्षा आहे. रोमियो जुलियट, सलीम अनारकली, लैला मजनू अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी प्रेमाची एक वेगळी कसोटी जगासमोर आणली होती. २१व्या शतकात सुद्धा या कसोटीला पर्याय उपलब्ध झालेला नाही आहे आणि हेच सांगायला  एम एक्स प्लेयर घेऊन येत आहे 'शिवराज वायचळ' आणि 'शिवानी रांगोळे' यांची प्रमुख भूमिका असलेली सीरिज 'इडियट बॉक्स'. पाच एपिसोडची ही सीरिज आकाश (शिवराज) त्याच्या प्रेयसी शाश्वतीला मिळवण्यासाठी करत असलेली धडपड आणि यासाठी त्याची मदत करणारी सायली (शिवानी रांगोळे) यांची एक वेगळीच धमाल कथा सांगत आहे. 
                     हेरगिरी करण्यापासून ते आपल्या प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लढणाऱ्या एका कट्टर प्रेमीं आपल्या प्रेयसीला परत मिळवण्याचा प्रवास 'इडियट बॉक्स' ही सीरिज सांगते. या सीरिजचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला तुमच्या आवडत्या मालिकांसारखा वाटेल. या सीरिज बद्दल आकाश म्हणजेच शिवराज सांगतो 'आयुष्यात प्रत्येक जण या सगळ्यातून जातो, आपल्या प्रेयसी प्रियकर यांना परत मिळवण्यासाठी प्रत्येक जण एकदा तरी प्रयत्न करतोच. इडियट बॉक्स सीरिज त्यांचीच कथा तुमचा समोर रंजकतेने मांडते. आकाशची ही प्रेम कथा आणि त्याचा हा प्रवास अनेकांना आपलासा वाटणारा आहे आणि हेच मला फार आवडलं आहे, आणि ते प्रेक्षकांना ही आवडेल हे नक्की.' ' सायली ही अशी व्यक्ती आहे जी तिच्या मित्राला सुखी बघण्यासाठी शक्य ते करू शकते. या पात्रांची सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे तीच स्वतःचा स्वार्थ न जपता आकाशची मदत करणं. सुरुवातीला एक साधं पात्र जरी वाटत असल तरी नंतर 'सायली'चे अनेक पैलू तुम्हाला दिसू लागतील. निरागस आणि अगदी टीव्ही मालिकेसारखी असलेली ही सीरिज या मान्सून मध्ये बघण्यासाठी उत्तम आहे.' असं सायली साकारत असलेली शिवानी रांगोळे आपल्या पात्राबद्दल सांगते. जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांच दिग्दर्शन असलेल्या या सीरिज मध्ये स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टाकसाळे, प्रवीण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे आणि आशय कुलकर्णी असे मराठीतले दिग्गज आणि आघाडीचे कलाकार आहेत. ही सीरिज मराठी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ,तेलुगू या भाषांमध्ये २४ तारखेपासून एम एक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

Trailer Link : https://bit.ly/IdiotBox_Trailer

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

चंदगड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच; आणखी ४१ कोरोनाबाधित


चंदगड (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्यात कोरनाने कहरच केला आहे. सोमवारी दुपारी आलेल्या अहवालात तालुक्यातील ४१ कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २३८५ रुग्ण संख्या झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. पहिल्या जिल्ह्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. 

चंदगड तालुक्यातील 41 रुग्णांची गावे पुढीलप्रमाणे - 
हलकर्णी - 4, किरमटेवाडी - 2, तांबुळवाडी - 15, माणगाव - 1, धुमडेवाडी -4, सत्तेवाडी - 1, कोकरे - 1, सुळे - 1, कडलगे बुद्रुक - 1, नांदुरे - 1, भोगोली -1, आडूरे - 1, तुर्केवाडी - 1, मौजे कार्वे - 1, वाघोत्रे - 1, बसर्गे - 1, करजगाव - 1, जटेवडी (मजरे) - 1, इनाम म्हाळुंगे - 1, सडेगुडवळे - 1

Sunday, July 19, 2020

आजरा तालुक्याची शंभरीकडे वाटचाल; रविवारी तीन नवे कोरोनाबाधित

आजरा (प्रतिनिधी) :

कोरोनाच्या वाढत्या संख्येने कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासुन लॉकडाऊन होणार असतानाच आजरा तालुक्यात रविवारी तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तीनही रुग्ण मलिग्रे गावातील आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ९९ झाली आहे. सध्या सीपीआर कोल्हापूर व कोविड सेंटर आजरा येथे ११ रुग्ण उपचाराखाली आहेत. ८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Saturday, July 18, 2020

कडक लॉकडाऊन; कोल्हापूर जिल्हयात 20 ते 26 जुलै प्रतिबंधात्मक आदेश जारी


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्हयात कोरोना विषाणू  (कोविड-19)  प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून या आदेशानुसार जिल्हयात रविवार दि. 19 जुलै 2020 रोजी रात्री 12 वा. ते दि. 26 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत काही बाबी वगळता सर्व आस्थापना, सेवा, नागरिक व वाहने यांची हालचाल संपूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये फक्त सुट दिलेल्या बाबी, सेवेतील वाहने व प्रवासी वगळून उर्वरित सर्व कोल्हापूर जिल्ह्यात येणारी व जिल्ह्याबाहेर जाण्यास प्रवासी व वाहनांना तसेच लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इ. कार्यक्रमांना बंदी असेल. बंदी आदेशातुन सुट दिलेल्या बाबी दुध, औषधे इ. सेवांसाठी नागरिकांना सकाळी 6 ते सकाळी 9 व सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत खाजगी आस्थापनामध्ये जाता येईल. अत्यावश्यक व तातडीच्या वेळी मात्र नागरिकांना इतर वेळी अत्यावश्यक बाबी व सेवा घेता येतील.

या बंदीआदेशातुन खालील बाबींना सुट देण्यात येत आहे.

यामध्ये अ) अत्यावश्यक सेवा व आस्थापना :

1) सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱ्या आस्थापना. 
2)  बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे सुरु राहतील. 
3) मा. न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत सुरु राहतील.  
4) दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंटमिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील. 
5) सर्व वैद्यकीय, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ॲम्ब्यूलन्स यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेणेची आवश्यकता नाही.
 6) पेट्रोल/डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. 
7) वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील. 

ब) जीवनावश्यक सेवा व आस्थापना :

1) दुध संकलन, वाहतूक सकाळी 5 वा. ते सकाळी 9 वा. व सायंकाळी 4 ते सायंकाळी 7 वा. पर्यंत सुरु राहील.
 2) किरकोळ दुध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी 6 ते सकाळी 9 वा. पर्यंत सुरु राहील. 
3) एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वा. पर्यंत.सुरु राहतील. 
4) ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वा. पर्यंत सुरु राहतील. 
5) दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील.
6) वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण साठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सूरु राहतील. 

क) उद्योगधंद्याबाबतीत :
 
1) कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे बंद राहतील. परंतू ज्या उद्योगधंद्यात व बांधकामांचे साईटवर कामगारांना पूर्ण वेळ राहणेची सोय आहे असे कामगार व त्या उद्योगातील माल वाहतूक बाहेर न करणेच्या अटीवर असे उद्योग व बांधकामे सुरु ठेवणेस परवानगी असेल. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 15% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. 
2) ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खाजगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 25% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. अशा आस्थापनांनी त्यांची कर्मचारी क्षमता प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.मं. व जिल्हा उद्योग अधिकारी (DIC) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावी. या आस्थापनेमधील सर्व अधिकारी / कर्मचारी /कामगार यांनी त्यांचे ओळखपत्र व उद्योग विभागातील संबंधीत अधिकारी यांनी प्रमाणित केलेले आस्थापनेचे पत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

ड) ग्रामीण भागातील शेतीची कामे. 

इ) इतर अनुषंगाने

 1) अंत्यसंस्कार / अंत्ययात्रे साठी जास्तीत जास्त 10 नातेवाईक / नागरिक यांना हजर राहता येईल. मृत व्यक्तींच्या नजीकच्या व्यक्तींचे सांत्वन शक्यतो दूरध्वनीवर करण्याबाबत सुचित करण्यात येत आहे.

 ई) कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेशाप्रमाणे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.
        
बंदी आदेशातुन सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती व वाहनांना ई परवाने स्थगित :

जिल्ह्यात 20 जुलै पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरूपातील प्रवासाचे कोणतेही ई-परवाने तसेच इतर परवानग्या आजपासून पुढील दोन आठवडे कालावधीसाठी देण्यात येणार नाहीत. यामध्ये केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवासी असल्यासच (आधारकार्ड पत्यानुसार) परवानगी देण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे यातून मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय तातडीस सुट असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट राहील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Friday, July 17, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात गेले पंधरा दिवसात कोरोनाच्या मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा १७०० च्या पुढे गेला आहे. विशेष करून ग्रामीण भागात कोरोनाचे संकट गडद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा लॉकडाऊन सोमवार (दि. २०) पासुन सात दिवस असणार आहे. याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या कालावधीत फक्त मेडिकल व दूध सेवा सुरू राहणार आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

चंदगड तालुक्यात २७ नवे कोरोनाबाधित


चंदगड (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्यात कोरपनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार चंदगड तालुक्यात कोरोनाचे नवे २७ रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्यांमध्ये तांबुळवाडी 15 , कडलगे 1 , हलकर्णी 1 , सडेगुडवळे 1 , जट्टेवाडी 2 , शिरगाव 1 , सातवणे 2 , भोगोली  1, सुरूते 1, लाकुडवाडी 1, मलतवाडी 1 या गावातील रुग्णांचा समावेश आहे.

Thursday, July 16, 2020

आजरा तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.६१ टक्के


आजरा (प्रतिनिधी) :

कोरोनामुळे लांबलेला बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये आजरा तालुक्याचा ९५.६१ टक्के इतका निकाल लागला आहे. या परिक्षेसाठी तालुक्यातून ११९० इतके विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ११३४ इतके विद्यार्थी पास झाले आहेत. 

तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज प्रमाणे निकाल

आजरा कनिष्ठ महाविद्यालय - ९५.६५%

आजरा कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभाग - ९८.२७%

उत्तूर ज्युनिअर कॉलेज - ९३.६१%

बापूसाहेब सरदेसाई ज्यु. कॉलेज निंगुडगे - ८७.८७%

ऊर्दू ज्यू. कॉलेज - ८२.१४%

व्यंकटराव ज्यु. कॉलेज - ९७.६९%

ओम पॅरामेडिकल - ९५.६५%

आर्टस, सायन्स अण्ड कॉमर्स ज्यु. कॉलेज - ९७.५०%

नवकृष्ण हॅली उत्तूर - १००%

बारावीचा निकाल जाहीर; ९०.६६ टक्के राज्याचा निकाल


पुणे (प्रतिनिधी) :

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.

मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.४ टक्के लागला आहे. कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC 95.07 टक्के, टक्के निकाल लागला आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?

> www.mahresult.nic.in

> www.hscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

असा पाहा निकाल –

> वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
> वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
> आसनक्रमांक टाका
> विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
> निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
> निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

त्याचबरोबर www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

यंदाच्या वर्षी बारावीच्या  परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे.  १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली.

Saturday, July 11, 2020

महानायक अमिताभ बच्चन करोना पॉझिटिव्ह




मुंबई (प्रतिनिधी) :

महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांना नानावटीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे.  अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

Tuesday, July 7, 2020

चंदगड तालुक्यातील झांबरे भाग नेटवर्क सुविधापासून वंचित


चंदगड (प्रतिनिधी) :

 चंदगड तालुक्यातील देसाईवाडी-झांबरे या भागातील कित्येक गावे ही नेटवर्कपासून वंचित आहेत. त्यामुळे येथील लोकांचे जीवनमान हे आजही सुधारले नाही. अनेक समस्यांना हि गावे तोंड देत आहेत. आडुरे, कोकरे, किरमटेवाडी, न्हावेली, माळी, पेडणेकरवाडी, उमगाव, सावतवाडी, खळणेकरवाडी, झांबरे इत्यादी गावे जंगली, डोंगरालगत आहेत. दळणवळणाच्या सुविधा सुधारल्या नाहीत, आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे येथील लोकांची मोठी कसरत होत आहे. या भागातील लोकांना बाहेरील गावी या तालुक्यात संपर्क होत नाही. कारण या भागात नेटवर्कचा अभाव आहे. कोणताही टॉवर  या सर्व भागामध्ये नाही. त्यामुळे अनेक अडचणी लोकांना येत आहेत. डोंगर व जंगली भाग असल्यामुळे येथे सार्वजनिक आपत्ती, जीवितहानी होते. तसेच अडचणीच्या, संकटाच्या काळात कोणाचाही संपर्क होत नाही. त्यामुळे शासनाकडून  लवकरात लवकर या  मागण्याची दखल घेतली जावी अशी येथील जनतेची विनंती आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Monday, July 6, 2020

आजरा तालुकावासियांच्या चिंतेत वाढ; पुन्हा पाच कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

पुन्हा एकदा आजरा तालुकावासियांच्या चिंता वाढत आहेत. सोमवारी सायकांळच्या अहवालात तालुक्यातील पाच जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ वर पोचली आहे. सोमवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २५ व २३ वर्षीय महिला तर ८५ वर्षाच्या वृध्दासह २६ व २१ वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे. यात भादवणमधील दोन तर भादवणवाडीतील तिघांचा समावेश आहे. सोमवारी गडहिंग्लज तालुक्यात दोन रुग्ण सापडले. हे रुग्ण हेब्बाळ जळद्याळ व कुमरी येथील आहेत. सायंकाळी जिल्ह्यात एकूण ११ रुग्ण सापडले.

Sunday, July 5, 2020

राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट लवकरच सुरू होण्याची शक्यता; मुख्यमंत्री ठाकरेंचे सुतोवाच


मुंबई (प्रतिनिधी) : 

राज्यातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे स्थान मोठे आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला गती देण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात येत असून ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून हे संकेत दिले.


पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे, ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हॉटेल्स सुरू करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे, असं सांगतानाच आज जे स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरू करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. करोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 

हॉटेल्स १०० टक्के लगेच सुरु करत येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करतो आहोत असे सांगून प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, हॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल, असं मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितलं. तर इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले की, या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे. आज आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरीत कामगार आहे.काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टोंरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरु करायला परवानगी द्यावी, इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते. त्यामुळे पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहावे जेणे करून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व

जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व


विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :

"गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:"

‘गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

गुरूपौर्णिमेचा इतिहास :

गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.

कधी आहे गुरूपौर्णिमा :

भारतात पूराण काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत. त्याकाळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरूगृही राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरूकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरूकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जाते. या वर्षी ‘5 जुलै’ ला गुरूपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.


गुरूपौर्णिमेचे महत्त्व :

शाळा, कॉलेज, व्यवसायक्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरू हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरू रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते. त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. कारण ज्याच्या आयुष्यात गुरू असतो त्याला त्याच्या गुरूकडून  जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ मिळत असत.

गुरूपौर्णिमा साजरा करण्याचा उद्दिष्ट :

गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला  आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते. गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरूपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमा माहिती आणि गुरूपूजन :

गुरूपौर्णिमेला ‘गुरूपूजन’ करण्याची पद्धत आहे. गुरूपूजन म्हणजे गुरूंची पाद्यपुजा करणे. मात्र गुरूपूजन म्हणजे केवळ गुरूची पाद्यपुजा करणे अथवा गुरूला वाकून नमस्कार करणं असं मुळीच नाही. गुरूला नमस्कार करणे अथवा गुरूंचा आदर राखणे हे जरी महत्त्वाचं असलं तरी हे खरं गुरूपूजन नक्कीच नाही. कारण खऱ्या गुरूला अशा दिखाव्याची मुळीच गरज नसते. गुरूपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं. गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरू बद्दल कृतज्ञ असणं. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरूपूजन. अशा प्रकारच्या गुरूपूजनातून गुरूला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरूला खरा आनंद होत असते. खऱ्या गुरूसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.

गुरूचे बदलत जाणारे स्वरूप :

आई, वडील  आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सदगुरूंचा मान देतात. मात्र आजकाल गुरू मार्ग दाखविण्याऐवजी व्यवहार करून शिष्यांची फसवणूक करतानाच जास्त दिसतात. त्याच प्रमाणे स्वतःजवळील अपूऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धीभेद करणारे गल्लाभरू गुरू गल्लोगल्ली निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या गुरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे खरे गुरू अथवा सदगुरू ओळखणे कठीण झाले आहे. यासाठी  शिष्याने गुरूची ओळख पटविण्यासाठी भोळसट भावापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करावा.

गुरूचे कार्य :

गुरूचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव  निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरूचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरूकडे असावी. कारण जेव्हा गुरूने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरूला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरू जाणावा. शिष्याला  जितकी गुरूची गरज असते तितकीच गुरूला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरू आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरूने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे.


शिष्याची वागणूक :

गुरूकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो त्या शिष्याला गुरूकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरूकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरूला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अंहकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठीच शिष्याची गुरूवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याचसोबत गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.

गुरू-शिष्याचे आदर्श उदाहरण :

भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. कृष्ण-अर्जुन, अर्जून- द्रोणाचार्य, एकलव्य- द्रोणाचार्य, चाणक्य- चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात. असं म्हणतात की, अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता की त्याच्या अंगातील केसांमधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येत असे. कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला. रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद हे उदाहरण देखील गुरू-शिष्यासाठी प्रसिद्ध  आहेत. त्याच प्रमाणे अलीकडच्या काळातील सचिन तेंडूलकर आणि आचरेकर सर ही गुरू शिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे. क्रिकेटप्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात. मात्र सचिनच्या व्यक्तिमत्त्वाला खरे पैलू त्याच्या गुरूंमुळे मिळाले. रमाकांत आचरेकर सरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडूलकर हे नाव लोकप्रिय झाले. आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरूंमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचू शकले. कलेच्या क्षेत्रात तर अनेक वर्षांची साधना गुरू आपल्या शिष्यासाठी पणाला लावत असतो. गायन क्षेत्रातही अनेक गायकांच्या गुरूंवरून त्यांच्या गाण्याचे घराणे ठरत असते.  व्यवसायात देखील गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योगधंद्यात प्रगती करणारे अनेक लोक आहेत. थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही हेच यावरून सिद्ध होते.

खरा गुरू कसा ओळखावा ? :

जो गुरू शिष्याच्या भल्याचा विचार करतो तो खरा गुरू. शिष्य चुकत असल्यास त्याला योग्य  आणि अचूक सल्ला देण्याचा जो प्रयत्न करतो. ज्याला शिष्याविषयी आंतरिक तळमळ वाटत असते. शिष्याची प्रगती होण्यामध्ये ज्या गुरूला धन्यता वाटते तोच खरा गुरू असतो.


गुरू ने सांगितलेला मार्ग अवलंबण्यासाठी कोणत्या गोष्टी शिष्यामध्ये असाव्या लागतात ? :

गुरूने सांगितलेला मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी शिष्यामध्ये नम्रपणा, गुरू बद्दल आदर, विश्वास आणि प्रेम, गुरूने सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याची ईच्छा, गुरूचा वारसा पुढे चालविण्याची तळमळ असणं गरजेचं आहे.

जीवनात गुरू असणे गरजेचे आहे का ? :

गुरू त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातीस समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते.

थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सदगुरू असोत खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरू अथवा सदगुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरूप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे  आहे. यासाठीच गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Saturday, July 4, 2020

गडहिंग्लज उपविभागात पुन्हा १५ कोरोनाबाधित; जाणून घ्या गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यात किती रुग्णांची झाली वाढ


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

ऐन पावसाच्या हंगामात गडहिंग्लज उपविभागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. यामुळे नागरिकांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शनिवारी उपविभागात एकूण १५ रुग्णांची वाढ झाली आहे. यात चंदगड तालुक्यातील तब्बल दहा, गडहिंग्लज तालुक्यातील दोन तर आजरा तालुक्यातील तीन नविन रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात २३ नवे कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत. 

Friday, July 3, 2020

आजरा तालुक्यात आणखी तीन कोरोनाबाधीत


आजरा (प्रतिनिधी) :

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्‍या आजरा तालुक्यात गेल्या आठ दिवसात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने तालुकावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात आणखी तीन कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८४ झाली आहे. शुक्रवारी सापडलेल्यामध्ये भादवण येथील १८ वर्षीय युवक तर भादवनवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष व २८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितापैकी ७४ जण कोरोनामुक्त झाले असून दोन जण मयत झाले आहेत. सध्या आठजण उपचार घेत आहेत.

विकास डिजिटल मिडीया 
📞 7410168989

लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावी : माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई यांची मागणी


गारगोटी (प्रतिनिधी) :

 कोविड 19 या महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे, कोरोना महामारीमुळे सरकारने गेले चार महिने लॉकडाऊन केल्यामुळे मोलमजुरी करणारे कामगार, कष्टकरी शेतकरी, दुकानदार यांचे काम बंद झाले आहे.  यामुळे  सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कामबंद आसलेने त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असुन त्यांची संपूर्ण वीज बिले माफ करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई यांनी महावितरण कडे केली आहे.
 
निवेदनातील आशय असा, महावितरण कंपनीने मार्च, एप्रिल, मे 2020 पर्यंतचे वीजबिल सरासरी दिले होते. पण आता त्यांनी भरघोस विजदरवाढ केल्याने सदरची बिले वाढीव आली आहेत. त्यामुळे सदरची विजबिले कशी भरावयाची याची चिंता सर्वसामान्य जनतेला आहे, तरी  मार्च 2020ते मे 2020 पर्यंतचे लॉकडाऊन काळातील वीजबिल पूर्ण माफ करावे व जून 2020 पासून महावितरण कंपनीने वीजदर वाढवला आहे तो वाढीव वीजदर रद्द करून जुन्या दराप्रमाणे वीजबिल आकरावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.

 यावेळी गारगोटीचे सरपंच  संदेश भोपळे, भुदरगड तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, तालुका संघ संचालक सदाशिव देवर्डेकर, शिवराज देसाई, गारगोटी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, राजेश भाट, अनिल तळकर,  बजरंग कुरळे, सुरेश  खोत, संग्रामसिंह पोपळे, निलेश खोराटे, सुहास कांबळे, प्रकाश सावंत, दिनकर देसाई,  गणपती पाटील याच्यासह नागरिक उपस्थित होते.

गारगोटीतील दत्त घाटावरील निकृष्ट बांधकामाची चौकशी व्हावी; सरपंच संदेश भोपळे यांची भुदरगड तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी


गारगोटी (प्रतिनिधी) :

दत्त घाट गारगोटी येथे वेदगंगा नदिकाठावर प्रादेशिक पर्यटन योजनेमधुन दोन कोटी सतावन्न लाख (2कोटी 57 लाख) रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या  पुलाचा कठडे वाहून गेल्याने संबधीत कामाचा दर्जा तपासुन संबधीत ठेकेदारावर कार्यवाही व्हावी आन्यथा आंदोलन करू असा इशारा गारगोटी नगरीचे लोकनियुक्त  सरपंच संदेश भोपळे यांनी भुदरगड तहसीलदार अमोल कदम व सार्वजनिक बांधकाम गारगोटी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे  दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी नगरीजवळून  वेदगंगा नदी गेली असल्याने या नदीच्या काठावर छोटा पूल बांधला आहे. सदर पुलाचे काम याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पुर्ण झाले. याच वर्षीच्या जूनमध्येच ते बांधकाम पडले. ही घटना  जून पावसाच्या सुरवातीलाच झाल्याने हे पूल तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर राहील का? अशी शंका आम्हा गारगोटी नगरीला पडली आहे. पुलाचे   काम सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य रुपाली कुरळे यांनी संबधीत ठेकेदार यांना सुरु असलेल्या निकृष्ट कामाबाबत सूचना देऊन देखील ठेकेदार मंडळीनी म्हणावे तितके लक्ष या तक्रारीकडे दिले नाही. यावेळी या गोष्टीकडे लक्ष दिले असते तर या पुलाचा कठडा वाहून गेले नसता असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच जयवंत गोरे, सदस्य अलकेश कांदळकर, सचिन देसाई,  आशाताई भाट, सुकेशनी सावंत, रुपाली बजरंग कुरळे, प्रकाश वास्कर, सविता गुरव, मेघा देसाई, अस्मिता कांबळे, राहुल कांबळे, स्नेहल विजय कोटकर यांच्यासह ग्रामस्थ  प्रकाश सावंत, संग्राम देसाई, संग्राम पोपळे, अरुण साळवी, सुरेशपापा देसाई  आदींचा सह्या आहेत.

विकास डिजिटल मिडीया 
7410168989

दिलासादायक; आजरा शहरातील "त्या" ३५ डॉक्टरांचे अहवाल निगेटिव्ह


आजरा (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज येथील कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या आजरा शहरातील ३५ डॉक्टरांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापूर्वी गडहिंग्लज येथे डॉक्टर असणार्‍या आजरा तालुक्यातील व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या डॉक्टरांचा आजरा तालुक्याशीही संपर्क आला होता. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. मात्र आता ३५ डॉक्टरांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सार्‍यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Wednesday, July 1, 2020

आजरा तालुक्यात आणखी दोन कोरोनाबाधीत; तालुक्याची रुग्णसंख्या ८१


आजरा (प्रतिनिधी) :

गेले काही दिवस कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्तीकडे तालुक्याची वाटचाल असा दिलासा मिळत असताना गेले दोन दिवस आजरा तालुक्यात कोरोनाबाधित सापडत आहेत. बुधवारी आणखी दोन कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८१ झाली आहे. यापैकी दोन मयत असून ७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी सापडलेल्या रुग्णामध्ये निंगुडगे येथील ७० वर्षीय पुरूषाचा तर हारुर येथील ६४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दोनही रुग्ण मुंबईहून आलेले आहेत.

आजरा शहर ४ जुलैपर्यंत लॉकडाऊन

 

आजरा (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज उपविभागातील मेडिकल क्षेत्राशी संबधित लोकच कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत परजिल्ह्यातून येणारे नागरिकांमध्ये असणारा कोरोना स्थानिक पातळीवर पसरत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आल्याची चर्चा असल्याने गडहिंग्लज शहर ५ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला असताना आता आजरा शहरदेखील ४ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती आजरा नगरपंचायत व प्रशासनाने दिली आहे. फक्त मेडिकल सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत.

करोनाचे संकट नष्ट होवो यासाठी मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडं



पंढरपूर (प्रतिनिधी) :

लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. करोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.


”आपण सगळे जणं माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी. माऊलीच्या समोर सगळे सारखेच आहेत. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे. मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडं घातलं.

बुधवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठल मंदिरात सहा वर्षे सेवा करणाऱ्या बडे दाम्पत्याला यावर्षी महापूजेचा मान मिळाला

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी यात्रेवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे मानाच्या ९ पालख्या या वारकऱ्यांशिवाय पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पंढरीत गर्दी होऊ नये म्हणून दि २९ जुलै ते २ जुलै या चार दिवसा करीता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

गडहिंग्लज शहर १ ते ५ जुलैअखेर पुन्हा लॉकडाऊ; उपविभागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने निर्णय


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे गडहिंग्लज शहर १ ते ५ जुलैअखेर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद राहणार आहे. मध्यंतरी काही दिवस रुग्ण आढळले नव्हेत. त्यामुळे दिलासादायक वातावरण होते. मात्र आता पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत. त्यात काही स्थानिकांचा देखील समावेश आहे. त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे गडहिंग्लज शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...