गारगोटी (प्रतिनिधी) :
कोविड 19 या महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे, कोरोना महामारीमुळे सरकारने गेले चार महिने लॉकडाऊन केल्यामुळे मोलमजुरी करणारे कामगार, कष्टकरी शेतकरी, दुकानदार यांचे काम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कामबंद आसलेने त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असुन त्यांची संपूर्ण वीज बिले माफ करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई यांनी महावितरण कडे केली आहे.
निवेदनातील आशय असा, महावितरण कंपनीने मार्च, एप्रिल, मे 2020 पर्यंतचे वीजबिल सरासरी दिले होते. पण आता त्यांनी भरघोस विजदरवाढ केल्याने सदरची बिले वाढीव आली आहेत. त्यामुळे सदरची विजबिले कशी भरावयाची याची चिंता सर्वसामान्य जनतेला आहे, तरी मार्च 2020ते मे 2020 पर्यंतचे लॉकडाऊन काळातील वीजबिल पूर्ण माफ करावे व जून 2020 पासून महावितरण कंपनीने वीजदर वाढवला आहे तो वाढीव वीजदर रद्द करून जुन्या दराप्रमाणे वीजबिल आकरावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, भुदरगड तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, तालुका संघ संचालक सदाशिव देवर्डेकर, शिवराज देसाई, गारगोटी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, राजेश भाट, अनिल तळकर, बजरंग कुरळे, सुरेश खोत, संग्रामसिंह पोपळे, निलेश खोराटे, सुहास कांबळे, प्रकाश सावंत, दिनकर देसाई, गणपती पाटील याच्यासह नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment