आजरा (प्रतिनिधी) :
कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्या आजरा तालुक्यात गेल्या आठ दिवसात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने तालुकावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात आणखी तीन कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८४ झाली आहे. शुक्रवारी सापडलेल्यामध्ये भादवण येथील १८ वर्षीय युवक तर भादवनवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष व २८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितापैकी ७४ जण कोरोनामुक्त झाले असून दोन जण मयत झाले आहेत. सध्या आठजण उपचार घेत आहेत.
विकास डिजिटल मिडीया
📞 7410168989
No comments:
Post a Comment