गारगोटी (प्रतिनिधी) :
दत्त घाट गारगोटी येथे वेदगंगा नदिकाठावर प्रादेशिक पर्यटन योजनेमधुन दोन कोटी सतावन्न लाख (2कोटी 57 लाख) रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडे वाहून गेल्याने संबधीत कामाचा दर्जा तपासुन संबधीत ठेकेदारावर कार्यवाही व्हावी आन्यथा आंदोलन करू असा इशारा गारगोटी नगरीचे लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे यांनी भुदरगड तहसीलदार अमोल कदम व सार्वजनिक बांधकाम गारगोटी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी नगरीजवळून वेदगंगा नदी गेली असल्याने या नदीच्या काठावर छोटा पूल बांधला आहे. सदर पुलाचे काम याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पुर्ण झाले. याच वर्षीच्या जूनमध्येच ते बांधकाम पडले. ही घटना जून पावसाच्या सुरवातीलाच झाल्याने हे पूल तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर राहील का? अशी शंका आम्हा गारगोटी नगरीला पडली आहे. पुलाचे काम सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य रुपाली कुरळे यांनी संबधीत ठेकेदार यांना सुरु असलेल्या निकृष्ट कामाबाबत सूचना देऊन देखील ठेकेदार मंडळीनी म्हणावे तितके लक्ष या तक्रारीकडे दिले नाही. यावेळी या गोष्टीकडे लक्ष दिले असते तर या पुलाचा कठडा वाहून गेले नसता असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच जयवंत गोरे, सदस्य अलकेश कांदळकर, सचिन देसाई, आशाताई भाट, सुकेशनी सावंत, रुपाली बजरंग कुरळे, प्रकाश वास्कर, सविता गुरव, मेघा देसाई, अस्मिता कांबळे, राहुल कांबळे, स्नेहल विजय कोटकर यांच्यासह ग्रामस्थ प्रकाश सावंत, संग्राम देसाई, संग्राम पोपळे, अरुण साळवी, सुरेशपापा देसाई आदींचा सह्या आहेत.
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment