आजरा (प्रतिनिधी) :
कोरोनामुळे लांबलेला दहावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये आजरा तालुक्याचा ९९.१२ टक्के इतका निकाल लागला आहे. या परिक्षेसाठी तालुक्यातून १४८८ इतके विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४७५ इतके विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी तालुक्यातील ३२ पैकी तब्बल २७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थांचा भूगोलचा पेपर होऊ शकला नाही. तालुक्यात मुले पास होण्याचे प्रमाण ९८.८४ टक्के तर मुली पास होण्याचे प्रमाण ९९.४४ टक्के आहे.
तालुक्यातील शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे :
व्यंकटराव हायस्कूल : ९९.०६
आजरा हायस्कूल : १००
पं. दीनदयाळ विद्यालय : १००
शारदाबाई चव्हाण गर्ल्स हायस्कूल : १००
रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूल : १००
झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल : ८७.५०
उत्तूर विद्यालय : १००
वसंतरावदादा पाटील हायस्कूल उत्तूर : ९६.५५
पार्वती शंकर हायस्कूल उत्तूर : १००
पेरणोली हायस्कूल : ९७.४३
मडिलगे हायस्कूल : १००
भादवण हायस्कूल : १००
आदर्श हायस्कूल शिरसंगी : ९७.२९
आदर्श हायस्कूल गवसे : १००
एरंडोळ हायस्कूल : १००
चाफवडे हायस्कूल : १००
रवळनाथ हायस्कूल देवर्डे : १००
दाभिळ हायस्कूल : १००
माऊली हायस्कूल धनगरमोळा : १००
डायनॅमिक पब्लिक स्कूल सुळेरान : १००
वाटंगी हायस्कूल : १००
मलिग्रे हायस्कूल : १००
आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी : १००
केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी : १००
महात्मा फुले हायस्कूल हात्तिवडे : १००
आण्णासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड : १००
राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे : १००
माध्यमिक विद्यालय आरदाळ : १००
ल. बा. चोरगे हायस्कूल बेलेवाडी : १००
कर्मवीर विद्यालय चिमणे : १००
भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी : १००
छ. शिवाजी विद्यालय होन्याळी : १००
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
9049969625
No comments:
Post a Comment