मुंबई (प्रतिनिधी) :
महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांना नानावटीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.
No comments:
Post a Comment