कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता; जाणून घ्या काय राहणार सुरु आणि काय राहणार बंदच!
कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २० जुलैपासून एक आठवडा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२७) लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. याबाबाबतचे आदेश आणि नियमावली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी सायंकाळी जाहीर केली. हे आदेश ३१ जुलै मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
हे सुरू होणार
गॅस वितरण सकाळी नऊ ते सहा सुरु राहणार
शासकीय आणि मालवाहतूक
माॅल्समध्ये जीवनावश्यक वस्तू आणि धान्य विक्री करता येणार
पहाटे 6 ते सायंकाळी 6 पर्यंत दूध विक्री, भाजीपाला विक्रीस परवानगी
सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने, व्यवसाय,सर्व व्यापारी आस्थापना सुरू राहणार
शहरी व ग्रामीण भागातील उद्योगधंदे, एमआयडीसी 50 टक्के कामगारांसह सुरू राहणार
सर्व बँका, इन्शुरन्स कार्यालये सुरू राहणार
पेट्रोल-डिझेल पंप सुरू राहणार
सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवासी रिक्षा वाहतूक परवानगी
सर्व शासकीय कार्यालये
हे बंदच राहणार...
शॉपिंग मॉल्स,मार्केट, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, केश कर्तनालये, स्पा,ब्युटी पार्लर
हॉटेल,रेस्टॉरंट, लॉजिंग (क्वांरनटाईनसाठी तसेच वंदे मातरम योजनेंतर्गत घेतलेली हॉटेल, लॉज वगळता)
विवाह, साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदी तसेच सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम
सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक कामे वगळता संचारबंदी राहणार.
दुकाने तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये ६० वर्षावरील मालक, ग्राहक किंवा कर्मचारी म्हणून बाहेर पडता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment