कोल्हापूर (प्रतिनिधी) :
प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बाळासो लोहार यांनी आपले वडिल कै. बाळासो नामदेव लोहार (दादा) यांचा १० वा स्मृतीदिन सामाजिक उपक्रमाने साजरा केला. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या महामारीत निरपेक्ष भावनेने आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी काम करित आहेत. या कोरोना योद्धांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असाच गावातील कोरोना योद्धांचा वडिलांच्या स्मृतीदिनी गौरव करण्याचा निर्णय लक्ष्मण लोहार यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाला घरातील मंडळीनी पाठिंबा दिला. वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा लक्ष्मण यांनी पुढे सुरू ठेवला आहे. कोरोनाच्या महामारीतही आपल्या घरादाराचा विचार न करता राबणार्या हातांचा सन्मान करण्याचे काम लक्ष्मण लोहार यांनी केले. प्रयाग चिखली गावामध्ये कोरोना संकटकाळात काम करणार्या २१ आशा सेविका, १२ ग्रामपंचायत कर्मचारी, ७ आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका यांचा सन्मान लोकनियुक्त सरपंच उमा संभाजी पाटील, उपसरपंच अलका प्रभाकर पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, उत्पादन शुल्क खात्याचे निरिक्षक पी. आर. पाटील, दिलीप लोहार, मोहन लोहार, ग्रामसेवक बाजीराव इंगवले, तलाठी श्रीकांत नाईक, किशोर लोहार, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक उमा गुरव यांचाही सत्कार करण्यात आला. लक्ष्मण लोहार यांनी कोरोना काळात जपलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी लक्ष्मण लोहार, मोहन लोहार, दिलीप लोहार, किशोर लोहार, सुमन बाळासो लोहार, वासंती लोहार, शारदा लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment