Thursday, January 8, 2026

सोहाळे ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत : कोल्हापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस; मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत सोहाळे गावाला भेट....

आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील सोहाळे ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून गावच्या विकासासाठी आदर्शवत विकास कामे राबविली आहेत. येथील ग्रामस्थामधे सकारात्मक ऊर्जा दिसून येते. ग्रामपंचायतीचे काम प्रेरणादायी असे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकियन एस यांनी केले. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस यांनी सोहाळे (ता. आजरा) गावाला भेट दिली. येथील विविध विकासकामांची पहाणी केली. महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सुचना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, सरपंच भारती डेळेकर, उपसरपंच वसंत कोंडुसकर आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्तिकीयन एस म्हणाले, ग्रामस्थ एकत्र आले तर गावचा विकास होणे अडचणीचे ठरणार नाही. येथे राबविलेली विविध विकासकामे उत्तम आहेत. शासनाच्या विविध योजना गावामध्ये चांगल्या पध्दतीने राबविल्या जात आहेत. यामुळे शासनाचा हेतू सफल होतांना दिसत आहे. सर्वच पातळीवर सोहाळे गावात राबविण्यात येणारे उपक्रम कृतीशील पहावयास मिळतात. या वेळी गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रविंद्र गुरव, बांधकामचे उपअभियंता सुर्यकांत नाईक, शाखा अभियंता चिंतामणी लोंढे, विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, आर. एस. गवळी, आबासाहेब मासाळ, पाणीपुरवठा शाखा अभियंता मोरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पोवार, शिवाजी कोंडुसकर, उषा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक अजित रणदिवे यांनी स्वागत व आभार मानले.

सुप्रभात वाचनालय, अनंत विद्यामंदिरला भेट...
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस यांनी सोहाळे येथील सुप्रभात वाचनालयाला भेट दिली. सुभाष केसरकर यांनी वाचनालयाबाबत माहीती दिली. वाचनालयात १२ हजार पुस्तके असून वाचकांची संख्या मोठी असल्याचे सांगीतले. अनंत विद्यामंदिराचे शिक्षक मायकेल फर्नांडीस यांनी शाळेबदल माहीती दिली. लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट करत असल्याचे सांगीतले. याबाबत कार्तिकियन एस यांनी समाधान व्यक्त केले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...