आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यात नाटकांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. येथे होणाऱ्या नाट्यमहोत्सवाची राज्यात चर्चा आहे. येथील नाटयरसिक अभिरुची संपन्न असून येथे इटलीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक सादर व्हावीत, असे प्रतिपादन नाट्यलेखक व दिग्दर्शक विपुल देशमुख यांनी केले. येथील आजरा महाविद्यालयाच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या नाटयगृहात नवनाट्य कलामंच संस्था आजरा यांच्यावतीने आयोजीत कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाला थाटात सुरवात झाली. भांडा साैख्य भरे या नाटकांने पडदा उघडला. या वेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नवनाट्य कलामंचचे अध्यक्ष व नुतन नगराध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते.
नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष आनंदा फडके यांनी स्वागत तर योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. देशमुख पुढे म्हणाले, आजरा तालुक्यातील नाट्यप्रेमींची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाट्यचळवळ वाढीला बळ मिळाले आहे. येथील नाट्यमहोत्सव हे याचेच धोतक आहे. राज्यातील अनेक नामांकीत संस्था येथे नाटक सादर करण्यासाठी उत्सुक असतात. नगराध्यक्ष चराटी म्हणाले, नाट्यचळवळ वाढीसाठी पुर्वसुरीनी मोठे योगदान दिले आहे. नवनाट्यमंडळ हा त्याचा भाग आहे. आजऱ्याच्या मातीत नाट्यचळवळ रुजली आहे. त्याला बळ देण्याचे काम करणार आहे. नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चराटी, नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत चराटी, राज्य नाट्य स्पर्धेतील यशाबद्दल श्रुती कांबळे यांचा सत्कार झाला. त्याचबरोबर प्रायोजकांचाही सत्कार झाला. या वेळी श्रीमती अन्नपुर्णा चराटी, डाॅ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे, आय. के. पाटील, वासुदेव मायदेव, भिकाजी पाटील, मंगेश तेऊरवाडकर यांच्यासह नाट्यप्रेमी उपस्थित होते. वामन सामंत यांनी सुत्रसंचालन केले. यशवंत गीरी यांनी आभार मानले
सुसज्ज नाट्यगृह उभारणार....
आजरा तालुक्याला सांस्कृतिक अधिष्ठान आहे. येथे सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याची गरज असून नाट्यरसिक याची मागणी करीत आहेत. नाटयगृहासाठी प्रयत्न सुरु असून बारा कोटी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या दोन वर्षात सुसज्ज नाट्यगृह उभारणार असल्याचे नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी सांगीतले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment