आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत नैसर्गिक शेती तज्ञ श्री. राहुल टोपले यांचे 'नैसगिक शेती आणि विषमुक्त जीवन'या विषयावरील व्याख्यान झाले आपली नैसगिक, पारंपारिक शेतीच भविष्यात देशाला समृध्द आणि सामर्थ्यशाली बनवेल असे त्यांनी सांगीतले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते. वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ठ वाचक पुस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. यावर्षीचा उत्कृष्ठ वाचक पुस्कार गजानन भिमराव अपसंगी (चाफवडे) यांना तर बालवाचक पुरस्कार कु कादंबरी पांडुरंग धुरी (हाळोली) यांना देऊन गौरविण्यात आले .
राहुल टोपले म्हणाले, हरीतक्रांती नंतर पिकांचे उत्पादन वाढीसाठी देशात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. कंपोस्ट खतांचा कमी झाला, रासायनिक खत' व किटकनाशकांचा अतिरिक्त वापर केला गेल्याने आपली समृध्द नैसर्गिक कृषी परंपरा व्हास व्हायला सुरवात झाली. सद्याची शेती ही भांडवलदारांच्या हातात असून रासायनिक खते, औषधे यांच्या वापरामुळे तयार होणारे अन्नधान्यही विषारी होत आहे. रासायनिक, विषारी अन्न खाऊन आपले शारीरिक मानसिक आरोग्य बिघडत आहे कॅन्सर, हार्टअॅटॅक सारख्या रोगांचे वाढते प्रमाण हे रसायनयुक्त अन्नाचे परीणाम आहेत. निसर्गातील माती, पाणी या घटकांचा योग्य वापर करून अधिक उत्पन्न मिळविता येते. पारंपारीक शेतीसाठी व मानवी आरोग्यासाठी देशी गाईचे अनन्यसाधारण महत्व आहे. याकरीता देशी गोवंशाची वाढ करणे आवश्यक आहे मिशन ऑरगॅनिक या आपल्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना नैसगिक शेतीचे मार्गदर्शन होत असून लाखो शेतकरी पारंपारीक शेतीकडे वळले आहेत.
कार्यक्रमाला मुकुंददादा देसाई, नगरसेवक अनिकेत चराटी, सुधीर कुंभार, आप्पा पावले, मानसिंग देसाई , जितेंद्र शेलार, सुनिल शेवाळे, मारूतीराव मोरे, काका देसाई, मनोहर गव्हाणकर, सुनिल पाटील, शिवाजेराव देसाई, माधुरी टोपले, नगरसेविका स्मिता कुंभार, उज्वला गुंजकर, शर्मिला सातोसकर, रमा केळकर, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. गौरी भोसले, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते. संचालक संभाजीराव इंजल यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment