Tuesday, January 6, 2026

कानोली येथे व्यायामशाळा इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न....

आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळ यांचे कडून पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे माध्यमातून व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत कानोली (ता. आजरा ) येथे नवीन व्यायाम शाळा बांधकाम कामी निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील होत्या.

स्वागत व प्रास्तविक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना आजरा तालुका प्रमुख संजय पाटील, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, शिरसंगी सरपंच संदीप चौगुले तसेच संजय गांधी निराधार समितीचे सदस्य संतोष चौगुले या मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी, बोलताना संजय पाटील म्हणाले, या मतदार संघात आम. शिवाजीराव पाटील आणि ना. आबिटकर यांचे माध्यमातून विकासकामे चालू असून, या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम करावे. यापुढेही गावागावात विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. कानोलीतील  प्रलंबीत विकास कामासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. यावेळी संदीप चौगुले, संतोष चौगुले, सुषमा पाटील  शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसरपंच चंद्रकांत पाटील, सदस्य अनिल पाटील, सुधीरकुमार पाटील, स्वप्निल आर्दळकर, आरती देसाई, सारिका भोसले, दिपाली सुतार, शुभांगी पाटील यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीपती देसाई, पोलीस पाटील अनिल मुरुकटे, बाजीराव पाटील, दिनकर पाटील, बाळासाहेब सुतार, चंद्रकांत आ. पाटील, पी. एम. आपगे, रमेश भोगण, शंकर पाटील, पंडितराव पाटील, शहाजी भोसले, दिपक देसाई, आनंदा देसाई, अमरदीप आपगे, शिवाजी पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी स्नेहदीप सरदेसाई यांनी आभार मानले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...