आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे महारक्तदान शिबिर व रानभाजी पाककृती स्पर्धा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.
संवेदना संजीवनी टीम वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १६० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांचा संवेदना फाऊंडेशनतर्फे विशेष टी-शर्ट देऊन गौरव करण्यात आला. हे शिबिर संजीवनी ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सौजन्याने झाले. या उपक्रमासाठी डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. सुरजीत पांडव , संजय हरेर, संवेदना संजिवनी टीम सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
याच वेळी संवेदना निसर्गमित्र टीम वतीने रानभाजी महोत्सव व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.धनाजी राणे यांनी ही स्पर्धा रानात उगवणाऱ्या भाजीपाल्यांच्या पोषणमूल्य व औषधी उपयोगांचा गौरव करण्यासाठी आयोजित केली आहे असे सांगितले. या महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर व महिला शक्ती टीम यांच्या हस्ते झाले. डॉ. बाचुळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की "मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहारात ऋतुमानानुसार रानभाज्यांचा समावेश केला पाहिजे." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय अण्णाप्पा पाटील होते.
या स्पर्धेत ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. नव कृष्णा व्हॅली स्कूल उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी रानभाजी रोपांचे माहितीपर प्रदर्शन मांडून उपस्थितांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत शुभांगी राणे, नंदा सदाशिव सावंत, प्रियांका मोहन पायरेकर, मीरा गंगाराम हरेर, विमल दशरथ कसेकर यांनी अनुक्रमे यश मिळवले. तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार वर्षा कृष्णा होडगे, सरिता बाळासाहेब पाटील व सुगंधा परशराम हरळकर यांना प्रदान करण्यात आले. विजेत्यांना गृहोपयोगी भेटवस्तू सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तर सर्व सहभागींना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आजऱ्याचे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज, तालुका कृषी अधिकारी भुषण पाटील, पंडित दीनदयाळ विद्यालयाचे प्राचार्य संजीव देसाई, नव कृष्णा व्हॅली उत्तूरचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रानभाजी, कंदमुळे अभ्यासक मोहन माने, अॅड. एम. ए. पाटील, ढवळ, धनश्री देसाई व शुभांगी निर्मळे यांनी परिश्रम घेतले. तसेच पारितोषिकासाठी योगेश शिंदे, श्रीकांत कळसकर, पांडुरंग पाटील, संजय भोसले व मॅक्वीन फर्नांडिस यांनी सहकार्य केले. पं. दीनदयाळ विद्यालय आजराचा सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संवेदना निसर्गमित्र टीमचे गिरीधर रेडेकर, अमोल रेडेकर, महेश पाटील, सिद्धेश गिलबिले, रमेश सावंत, युवराज पाटील,अमर पाटील,अश्विन हरेर, तानाजी खाडे, श्रीतेज कवळेकर, अरूण घाटगे, फिलीप राॅड्रींक्स, गिताताई पोतदार सह सर्व संवेदना सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवेदना फाऊंडेशनचे सचिव संतराम केसरकर यांनी केले. आभार गिरीधर रेडेकर यांनी मानले.
======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment