Sunday, August 17, 2025

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क : 
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या  राजीनाम्यानंतर  भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP nadda) यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. 

सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते, यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कार्यरत होते.  सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी दिली.
=================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...