आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा येथे संस्थेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष पद भूषविलेले तसेच आजऱ्याच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्तृत्व व्यक्तिमत्व कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते त्यांच्या तैलचित्र प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जयवंतराव शिंपी म्हणाले, कै. अमृतराव (काका) यांनी आजऱ्याच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी आजरा राईस मिल, जनता बँक, तालुका संघ उभारला तसेच आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजरा साखर कारखान्याच्या उभारणीचेही स्वप्न पाहिले. अशा त्यांच्या अनेक कार्यकर्तृत्वांचा आढावा घेतला. संस्थान काळापासून आजरा येथे जाहीगिरदार घोरपडे सरकारांनी इचलकरंजी बरोबरच आजरा तालुक्यातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या व्यंकटराव हायस्कूल या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करत आजच्या या शाळेत आपण सर्व संचालक आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण त्याचबरोबर ॲकॅडमीचे वर्गही नवीन उभारलेल्या तीन मजली इमारतीच्या एकाच छताखाली सुरू केले आहे.
याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे सचिवअभिषेक शिंपी, संचालक कृष्णा पटेकर, पांडुरंग जाधव, सचिन शिंपी, सुधीर जाधव, विलास पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य सी. एस. पन्हाळकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले. आभार डी. आर. पाटील यांनी मानले.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment