मुंबई, न्यूज नेटवर्क :
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष या निर्णयाविरोधात येत्या 5 जुलैला भव्य मोर्चा काढणार आहेत. तसेच विविध पक्षांकडून या निर्णयाला विरोध होतोय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. विधी मंडळाचं सोमवार पासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदी भाषेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषाबाबत याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यात मराठी अनिवार्य केली आहे. कुणालाही भारतीय भाषा शिकता येईल, असा निर्णय आम्ही घेतला आहे. तरीही झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही. हिंदी ऑप्शनल आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं. त्यानंतर मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेशने लागू केलं. 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे शैक्षणिक धोरण कशाप्रकारे लागू करायचं यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. 16 ऑक्टोबर 2020 ला त्याचा जीआर निघाला. अतिशय नामवंत अभ्यासक या समितीत होते. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली. या समितीमधील सर्व लोकं मराठी, नामवंत, शिक्षण क्षेत्र समजणारे लोकं आहेत. 14 सप्टेंबर 2021 रोजी या समितीने 101 पानांचा अहवाल सादर केला. त्याचं ट्विट माझ्याकडे आहे. तो अहवाल स्वीकारताना उद्धव ठाकरे देखील होते. डीजीआयपीआरने याबाबत ट्विट केलं होतं, असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पहिला प्रश्न विचारला पाहिजे की, तुम्हीच या निर्णयाला मान्यता दिली तर आता कोणत्या तोंडाने आंदोलन करत आहात? हा प्रश्न विचारायला पाहिजे. ज्यादिवशी दुसरा जीआर काढला तेव्हाही भूमिका मांडली होती. आम्ही सक्तीची हिंदी करणार नाहीत. आम्हाला अशाप्रकारचे विषय सर्वानुमते करुन घ्यायचे आहेत. यावेळी आम्ही असा निर्णय घेतला की, त्रिभाषा सूत्रा संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, मुलांना काय चॉईस द्यावी, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात येईल. त्यांच्या नेतृत्वात एक समिती तयार केली जाईल. त्यात आणखी काही सदस्य असतील. त्यांची नावे लवकरच घोषित केली जातील", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्रबाबत निर्णय लागू केला जाईल. त्यामुळे 16 एप्रिल 2025 आणि 17 एप्रिल 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शासन निर्णय रद्द करत आहोत", असं देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं. "नवी समिती अभ्यास करेल. सर्वांचं म्हणणं ऐकून घेईल, त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेता येईल ते अहवालात सांगेल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ तो निर्णय मान्य करेल. आमची नीती विद्यार्थी आणि मराठी केंद्रीत असेल. यामध्ये आम्हाला कोणतही राजकारण करायचं नाही", असंही फडणीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
=======================
Sunday, June 29, 2025
Friday, June 27, 2025
कोल्हापूर येथील पर्यटक आंबोली येथे ३०० फूट खोल दरीत कोसळला
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क :
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो ३०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे या पर्यटकाचे नाव असून, ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोध मोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Thursday, June 26, 2025
‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात छत्रपती राजर्षी छञपती शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, राजर्षी शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक क्रांतीकारक नेतृत्व होते. बहुजन समाजाला शिक्षण, हक्क व स्वाभिमान देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शाहू महाराजांच्या विचाराने सुरु असलेल्या सहकार व दुग्ध व्यवसायाचा पाया आज गोकुळच्या रूपाने बळकट झाला आहे. गोकुळ संघ हा त्यांच्या चिरंतन विचारांचा पाईक आहे. गावखेड्यातील शेतकरी, दूध उत्पादक, महिला बचतगट, तरुण उद्योजक यांना सशक्त करण्यासाठी गोकुळने सातत्याने नवे प्रकल्प, अनुदाने व योजनांची आखणी केली आहे. गोकुळच्या प्रत्येक यशामागे शाहू महाराजांचे मूल्य आहे. शेतकऱ्याला आधार, कामगाराला सन्मान आणि सर्वसामान्य माणसाला न्याय. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गोकुळ संघ नेहमीच शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत राहील, हा विश्वास मी व्यक्त करतो असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया, मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.पी.जे.साळुंके, डॉ.प्रकाश दळवी, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ.विजय मगरे, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
=================

जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्र्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम सुरु असून या कामाला आणखी गती देऊया, असे आवाहन करुन आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता तालुकास्तरीय पुरस्काराची रक्कम 5 हजारावरून 10 हजार रुपये करावी तर जिल्ह्याच्या पुरस्काराची रक्कम 10 हजारावरून 25 हजार रुपयापर्यंत वाढवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या. शासकीय विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक, पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा, भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाला.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे काम करुन कामातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवावी. कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वजण मिळून काम करुया, असे आवाहन करुन ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील पुरस्कार हा कामाची पोचपावती असून आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा पुरस्कारामुळे मिळते. गुणवत्तेवर आधारित पुरस्कार मिळाल्यास त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी महापुरातून वाट काढत पोहोचलो होतो. त्यानंतरही उत्कृष्ट आमदार, उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळणे हे कामाचा आगळावेगळा सन्मान देणारे व आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून ई सर्व्हिस बुक सह विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच येत्या 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 50 हजार लाभार्थ्यांना घरकुल वितरीत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, समाजाला शिक्षित करण्याचे काम पत्रकार करतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असे पत्रकारांना म्हटले जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असून जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमुळे पुरस्कारार्थी, अधिकारी कर्मचारी व पत्रकारांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांची माहिती दिली. पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा व ई सर्व्हिस बुक तयार करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक डिजिटल स्वरूपात ठेवणारी पहिली शासकीय संस्था ठरली आहे.
तसेच भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीमुळे जमा खर्च जतन करणे तसेच कर्मचाऱ्यांना अद्यावत विवरणपत्र एसएमएस, ऍप द्वारे ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मानले.
==================

Monday, June 23, 2025
लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य द्यावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री कोल्हापूर माधुरीताई मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांच्याकडून उपायुक्त (नियोजन) संजय मरकळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील यांच्यासह सर्व कार्यान्वित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी अधिकारी-कर्मचारी वर्गाला लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून ते सोडवण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सुचविलेल्या तसेच सर्वसामान्यांच्या गरजेच्या विषयांना प्राधान्य द्या. त्यांनी रोजगार हमी योजना, वन विभागाकडील वनहक्क दावे तसेच वीज प्रश्नांबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर प्रत्यक्ष बैठका घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे शासनाचा वीजबिलापोटी होणारा सर्व खर्च वाचणार असल्याचेही ते म्हणाले.
मागील वर्षीच्या 696.33 कोटींच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. यात जिल्हा वार्षिक योजना 576.00 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 118.00 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 2.33 कोटी यांचा मंजूर सर्व 100 टक्के खर्च झाला आणि त्यास मंजूरी देण्यात आली. तसेच 2025-26 या चालू वर्षीच्या मंजूर 764.62 कोटी रुपयांच्या निधीत यात जिल्हा वार्षिक योजना 642.00 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 120.50 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी क्षेत्राबाहेरील 2.12 कोटींमधील विविध कामांबाबत चर्चा झाली. यातील मंजूर निधी मागील वर्षासारखाच तीन टप्प्यांत मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत 679 कोटी रुपये जिल्ह्यातील शाळांसाठी लागणार आहेत. पुढील काळात सीएसआर, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधूनही खर्च केला जाणार आहे. यावर्षी 357 दर्जेदार शाळा अभिनव प्रकल्पातून तयार होतील. यासह ग्रामीण आरोग्यसेवेला बळकटी देण्यासाठीही 32 कोटी रुपयांची तरतूद आहे असे त्यांनी सांगितले. आयत्यावेळी विचारण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांवरही संबंधित विभागाकडून अनुपालन सादर करण्यात येणार आहे.
पुरादरम्यान गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन उपलब्ध करावी : मंत्री हसन मुश्रीफ
जिल्ह्यात अनेक भागांत दरवेळी पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चा करताना शासनाच्या वन विभागाने, कृषी विभागाने आणि शेती महामंडळाने आपल्याकडील जमीन चाऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाला पूरस्थितीबाबत दैनंदिन माहिती सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील धरणांमध्ये 70 टक्के साठा निर्माण झाल्यावर जागरूक राहून पुढील नियोजन करा, असेही ते म्हणाले.
शालेय स्तरावर भौतिक सुविधांसह गुणवत्तेवर भर द्या : सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ
जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने भौतिक सुविधांची निर्मिती होत असताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विविध उपक्रमांतून तसेच प्रशिक्षणातून कामे हाती घ्यावीत, अशा सूचना सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या.

विकास कामांच्या बाबतीत बदनामी झाल्यामुळेच अशोक चराटी यांना लोकप्रिय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची गरज; आजरा येथील पत्रकार परिषदेत अन्याय निवारण समितीचा घणाघात
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या गत निवडणुकीत शहरातील नागरिकांनी ज्या विश्वासाने नगरपंचायतीची सत्ता अशोक चराटी यांच्या ताब्यात दिली, त्या विश्वासाला चराटी पात्र राहिले नाहीत. विकास कामांच्या बाबतीत दिरंगाई होऊन अशोक चराटी यांची पुरती बदनामी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्यात लोकप्रिय असलेले राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवावा, या उद्देशानेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी लोकप्रिय पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे, चराटी यांचा हा डाव सर्वसामान्यांच्या लक्षात आल्याचा घणाघात आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
यावेळी बोलताना अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे म्हणाले, आजरा येथील कार्यक्रमात अशोक चराटी यांनी आगामी नगरपंचायत निवडणूक पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगितले. चराटी हे एका पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाचा ते झेंडा खाली ठेवणार आहेत का? पालकमंत्री आबिटकर आपला झेंडा चराटी यांना देऊन विधानसभा निवडणुकीत निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या वर अन्याय करणार का? असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री आबिटकर यांचे काम करण्यासाठी अनेकांनी धरसोड वृत्ती केली. मात्र अन्याय निवारण समितीने प्रामाणिकपणे पालकमंत्री आबिटकर यांचे काम केले आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा नगरपंचायतीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु नगरपंचायतीतील सत्ताधारी मंडळींनी त्याचा गैरवापर करून आजरा शहराची वाट लावली आहे. शहरातची पाणीपुरवठा योजना हे त्याचे ठळक उदाहरण आहे. नगरपंचायतीतील कामामुळे पालकमंत्री आबिटकर यांची सुद्धा प्रतिमा मलिन होत आहे. आजरा नगरपंचायतीसाठी अन्याय निवारण समितीने प्रथम रणशिंग फुंकल्यानंतर सत्ताधारी मंडळींना जाग आली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी, दिरंगाई व अनागोंदी परिस्थिती आहे. कामाची गुणवत्ता तपासली जात नाही. स्थानिक प्रशासन व सत्ताधारी नेते या त्रुटीवर डोळेझाक करत आहे हे दुर्लक्ष करण्यामागची गुपित काय? अन्याय निवारण समितीने यावर तीव्र निषेध नोंदवून सत्ताधाऱ्यांच्या कडून कामाच्या गुणवत्तेची व पारदर्शकतेची मागणी केली आहे. तसेच आजरा नगरपंचायत क्षेत्रात अनधिकृत रित्या असणाऱ्या मतदार नोंदणी वगळण्याची मागणी समितीने केली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. आजपर्यंत समितीने सामाजिक व वैयक्तिक समस्यावर कार्य करत आजरा नगरपंचायत क्षेत्रात लोकहिताचे काम केले आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासास पात्र राहून निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही यावेळी बामणे यांनी सांगितले. यावेळी विजय थोरवत, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, जावेद पठाण, यशवंत चव्हाण, दयानंद भोपळे, ज्योतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण दिनकर जाधव उपस्थित होते.
================

साळगाव बंधारा पाण्याखाली, आजरा तालुक्यात जोरदार पाऊस
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सध्या आजरा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे तालुक्यातील हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव (ता. आजरा) बंधारा सोमवारी दुपारी पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून पेरणोली, देवकांडगाव कडे जाणारी वाहतूक सोहाळे मार्गे पर्यायी रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील सर्वच पाणी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
=====================

Wednesday, June 18, 2025
आषाढीवारीसाठी हलक्या व जड वाहनांना पथकरातून (टोल) सुट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पास जारी करुन घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
आषाढीवारीसाठी दि. 18 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून (टोल) सुट देण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. पथकरातून सुट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पास देण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तरी सर्व भाविकांनी पथकरातून सुट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कार्यालयीन वेळेत व सुट्टीच्या दिवशी हजर राहुन पास जारी करुन घ्यावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

Monday, June 16, 2025
आजरा येथे गॅस गिझर मधील गॅस गळती होऊन नवविवाहित दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझर मधील गॅस गळती झाल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आजरा जवळील भावेश्वरी कॉलनी येथे घडली. सागर सुरेश करमळकर (वय ३२) व सुषमा सागर करमळकर (वय ३०) अशी मयत पती पत्नीची नांवे आहेत.
सागर व सुषमाचा विवाह २० मे रोजी झाला होता. सागर यांचे आजरा शहरातील शिवाजीनगर येथे घर आहे. गेल्या वर्षीच त्यांनी आजरा पासून जवळ असणाऱ्या महागांव रोड शेजारी बुरुडे गावाजवळील भावेश्वरी कॉलनी येथे बंगला बांधला होता. लग्नानंतर सागर व त्याची पत्नी तेथेच रहात होते. सुषमा हीचे माहेर धारवाड (कर्नाटक राज्य) येथील आहे. काल (रविवारी) सागर आपली पत्नी व मित्रांबरोबर आंबोलीला फिरायला गेले होते. त्यानंतर रात्री व सकाळी सागरच्या मित्रांने मोबाईलवर संपर्क साधला मात्र मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. मित्रांने तातडीने घर गाठले. दार उघडून आत जावून हाक मारली मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. याची कल्पना मित्राने सागरचे कुटुंबीय व इतर मित्रांना दिली. सर्वांनी जाऊन पाहिले असता सागर व त्याची पत्नी सुषमा बाथरूम मध्ये मृतावस्थेत आढळले. बाथरूम मधील गॅस गिझर मधील गॅस गळती झाल्याने गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची माहिती मिळताच आजऱ्याचे सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी तातडीने भेट दिली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सपोनि यमगर यांनी सांगितले.

Sunday, June 15, 2025
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व 17 जागा लढवणार
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती आजरा नगरपंचायतीच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व 17 जागा लढवणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक अन्याय निवारण समितीमार्फत देण्यात आली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीची बैठक आजरा येथे पार पडली. या बैठकीत आगामी आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५ संदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत एकमताने ठरविण्यात आले की, अन्याय निवारण समिती नगराध्यक्ष पदासह सर्व १७ नगरसेवक पदांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी आणि विकासाचा पर्याय ठरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या हितासाठी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प समितीने या वेळी व्यक्त केला.
===================

Saturday, June 14, 2025
म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविणार : गोकुळ दूध संघ चेअरमन नविद मुश्रीफ
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाचे वरिष्ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाली. या मिटिंगमध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना, म्हैस दुधाच्या संकलन वाढीच्या संधी व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गोकुळच्या चेअरमनपदी निवड झालेलेबद्दल नविद मुश्रीफ यांचा संघाच्या अधिकारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा म्हैस दुधासाठी राज्यभर ओळखला जातो. म्हैस दुधाची बाजारपेठ अधिक व्यापक असून दुधाची मागणी जास्त आहे. त्यामुळे म्हैस दुधाचे संकलन वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोकुळच्या जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच दूध उत्पादकांसाठी असलेल्या गोकुळच्या विविध योजना भविष्यात अधिक प्रभावीपणे राबविणार असून जिल्ह्यातील व सीमा भागातील जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. ज्यामुळे भविष्यात वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट साध्य होईल असे मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, दुग्ध व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, आहार नियोजन व दर्जेदार पशुखाद्याचा वापर महत्वाचा आहे. तसेच संघाच्या विविध योजना, फर्टीमीन प्लस या मिनरल मिक्स्चरचा व महालक्ष्मी पशुखाद्याचा नियमित वापर, आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त करावा यासाठी संकलन व पशुसंवर्धन, पशुखाद्य विभागामार्फत दूध उत्पादकांचे प्रबोधन करावे असे आवाहन केले.
या मिटिंगमध्ये दूध संकलनातील घट वाढ, कार्यक्षेत्रातील व बाहेरील दूध संकलन वाढीसाठी विविध उपायोजना, दुधाची गुणवत्ता, पशुसंवर्धन विभाग, पशुखाद्य विभाग, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन, संघाच्या विविध योजनांची अंमलबजावणीची गती वाढवणे या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी यांनी संकलन विभागाच्या सर्व अडचणी व संधी यांचा आढावा घेत उपाययोजना सुचविल्या. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले तर आभार संचालक किसन चौगले यांनी मानले. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संघाचे अधिकारी अनिल चौधरी, अरविंद जोशी, शरद तुरंबेकर, डॉ.प्रकाश साळुंके, व्ही.डी.पाटील, दत्तात्रय वाघरे संघाचे अधिकारी व सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते.
======================

Friday, June 13, 2025
बिग ब्रेकिंग; आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन तर पंचायत समितीचे चार सदस्य, कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 68
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेला सुरुवात झाली असतानाच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 68 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे गत वेळी जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितीचे सहा सदस्य असणाऱ्या आजरा तालुक्यासाठी आता जिल्हा परिषदेचे केवळ दोन तर पंचायत समितीचे चार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीन मतदारसंघात तालुका विभागलेला असतानाच आता जिल्हा परिषद सदस्य संख्या दोन केल्यामुळे तालुक्याच्या राजकीय मर्यादा स्पष्ट होत आहेत.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून राज्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक आहे. या निवडणुका विविध कारणाने लांबणीवर पडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याच्या आदेश दिल्यानंतर आता प्रभाग रचनेपासून या निवडणुकीला प्रारंभ होत आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शहरात नगरपंचायत व नगरपरिषदा निर्माण झाल्यानंतर गतवेळी 67 सदस्य संख्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या नेमकी किती होणार याकडे लक्ष लागले होते. आगामी निवडणुकीसाठी यामध्ये एकने वाढ होत ती 68 झाली आहे. यामध्ये करवीर व कागल तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढली आहे. मात्र आजरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद सदस्य संख्या कमी झाली आहे. सदस्य संख्येचा निर्णय 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद तालुकावार सदस्य संख्या व पंचायत समिती सदस्य संख्या : शाहूवाडी चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य, पन्हाळा सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती सदस्य, हातकणंगले अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समिती सदस्य, शिरोळ सात जिल्हा परिषद सदस्य व चौदा पंचायत समिती सदस्य, करवीर बारा जिल्हा परिषद व चोवीस पंचायत समिती सदस्य, गगनबावडा दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य, राधानगरी पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती सदस्य, कागल सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती सदस्य, भुदरगड चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य, आजरा दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य, गडहिंग्लज पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती तर चंदगड चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य अशी एकूण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या साठी 68 सदस्य संख्या असून जिल्ह्यातील पंचायत समिती साठी 136 सदस्य संख्या राहणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकाकरिता प्रभाग रचना कार्यक्रम :
14 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करणे.
21 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे.
28 जुलै 2025 पर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे.
11 ऑगस्ट 2025 पर्यंत विभागीय आयुक्त यांनी प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे.
18 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे.
====================

Wednesday, June 11, 2025
‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम : मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस; गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी घेतली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई, न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गोकुळच्यावतीने मा. मुख्यमंत्री महोदयांचा कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर, आमदार विनयरावजी कोरे, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य युवाशक्ती प्रदेश अध्यक्ष समित कदम, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच गोकुळचे संचालक व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करताना सांगितले की, “गोकुळच्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यात गोकुळचा मोठा वाटा असून सहकार क्षेत्रातील इतर संस्थांनी देखील गोकुळचा आदर्श घ्यावा. गोकुळने उत्पादन, गुणवत्ता आणि शेतकरी हित यांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे.”
गोकुळच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे विविध मागण्या सादर करण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी या परिसरात नवीन विस्तारित दुग्ध शाळेसाठी १५ एकरपर्यंत औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची तसेच पुणे येथे नव्या पॅकिंग स्टेशनसाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय राज्य शासनाच्या धोरणानुसार फक्त गाय दूध उत्पादकांना अनुदान दिले जाते; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूध उत्पादकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांनाही प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने २०२५ पासून राज्यात लागू केलेल्या सौर उर्जा संदर्भातील मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमुळे वाढलेला आर्थिक भार लक्षात घेता, या धोरणाच्या अटी व शर्तींमध्ये शिथिलता आणावी अथवा फेरविचार करावा, अशी विनंतीही गोकुळच्या वतीने करण्यात आली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गोकुळसारख्या सहकारी संस्थांच्या उद्योग विस्तारासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. वरील मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल,”असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्यान गोकुळच्या भविष्यातील औद्योगिक, ऊर्जा बचत व गुणवत्ता आधारित योजनांवर ही चर्चा झाली. गोकुळचे स्वयंपूर्ण ऊर्जानिर्भरता या बाबतीत राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संघाचे संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.
==========

Monday, June 9, 2025
ग्राहक मेळाव्यातून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महावितरण जनता दरबार मधून अधिकाऱ्यांना निर्देश
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग निहाय ग्राहक मेळावे घ्या. यामध्ये नवीन जोडणी, बिल दुरुस्ती, शेती कनेक्शन आदी विषयांबाबत वीज ग्राहकांचे प्रश्न वा शंकांचे निरसन तात्काळ करा. याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना यामध्ये सामावून घेऊन गतीने कामे पूर्ण करा व केलेल्या कामाचा अहवाल सादर करा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित महावितरण कार्यालयाच्या जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, विद्युत निरीक्षक शकील सुतार, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, डॉ. निता माने, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार उपस्थित होते.
आरडीएसएस सुधारित वितरण क्षेत्र योजनेतर्गत मंजूर व प्रस्तावित कामे यात केंद्र शासन पुरस्कृत योजना, विद्युत हानी कमी करणे, नवीन लिंक लाईन, कंडक्टर बदलणे इत्यादी कामाबाबत त्यांनी आढावा घेतला. आशियाई विकास बँक अनुदानातील प्रस्तावित नवीन सब स्टेशन, नवीन घरगुती कनेक्शन, डोंगरी विकास कार्यक्रम आराखडयातील प्रस्तावित कामे, 11 तालुक्यांचा डीपीआर तयार आहे, नवीन पोल टाकणे, नवीन लाईन टाकणे, मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहीनी 2.0 सद्यस्थिती, सौर कृषी पंप, मागेल त्याला सौर कृषी, कुसुंम ब योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंमलबजावणी, जिल्हा वार्षीक योजनेतील कामांचा आढावा, निरंतर योजना, एसीएफ योजना, तक्रार निवारण प्रणाली अंमलबजावणी, वीज अपघात नुकसान भरपाई सहाय्यता प्रकरणे यासह महापारेषण कडील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. झालेल्या कामांचे लोकार्पण तातडीने करून सुरू कामेही मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
पुढे बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, भविष्यात टीओडी मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना सौर ऊर्जेमुळे वीज दरात फायदा होणार आहे. वीज अपघात, जळीत प्रकरणात पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्या, वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारी विहित कालावधीत सोडवा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पूर बाधित क्षेत्रातील कृषी वीज जोडणी व ७.५ एचपी वरील शेतकऱ्यांना वीजबिल माफी याकरता शासन स्तरावर प्रयत्न करणार, असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
यावेळी उपस्थित ग्राहकांच्या तक्रारींना व प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. तर वीज विषयक तक्रारींच्या अनुषंगाने बोलताना सदर तक्रारीं लवकरात लवकर निकाली काढू असे कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी महावितरणच्या वतीने सांगितले. या जनता दरबार करता जिल्ह्यातील एकूण 189 ग्राहकांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्याकरता महावितरणने स्वतंत्र लिंक तयार केली होती. या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन 91 अर्ज सादर झाले व ऑफलाईन पद्धतीने 98 अर्ज सादर झाले. एकूण प्राप्त अर्जांमध्ये नवीन वीज जोडणी, वीज देयके दुरुस्ती, वीज पुरवठा खंडित होण्याबाबत, पारंपरिक वीज जोडणी बाबत, वीज दाब पुरेसा नसले बाबत, शेतीला पारंपरिक वीज जोडणी मिळणेबाबत, शेती पंपाच्या वीज भाराबाबत आदी विषयांवर तक्रारी प्राप्त झाल्या. प्रलंबित तक्रार अर्जांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे महावितरणकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव आबिटकर यांनी केले. या जनता दरबार करिता जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उप विभागीय अभियंते, विविध वीज ग्राहक संघटना प्रतिनिधी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार यांच्या पुढाकारामुळे वन हक्काचे प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा; पुणे येथे वन जमिनी व आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांची बैठक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
प.महराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर येथील आदिवासी बिगर आदिवासी समूहाचे वन हक्काचे प्रश्न समजून घेण्यासाठी पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आदिवासी विकास केंद्रामार्फत जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रतिभा शिंदे, कॉ संपत देसाई, दत्ता बाळसराफ, प्रकल्प सहसंचालक प्रदीप देसाई, अशोक आढाव, शोभा कारंडे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरवातीला प्रतिभा शिंदे यांनी प्रास्तविक करून ही बैठक का बोलावली आहे हे सांगितले. वैयक्तिक आणि सामूहिक प्रश्न समजून घेणे. काम करणाऱ्या सर्व संस्था संघटनांची व्यापक आघाडी करणं आणि हा प्रश्न पुढे घेऊन जाणं हा बैठकीचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. संपत देसाई म्हणाले की, प. महाराष्ट्र आणि कोकण विभागात वन हक्काचे वैयक्तिक आणि सामूहिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रशासनाकडून त्याला म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात तर एकही कम्युनिटी फॉरेस्ट राईटच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. बेळगाव परिसरात वन हक्काचे दावे मराठी भाषिक लोकांचे असल्याने कानडी प्रशासकीय अधिकारी मदत करत नाहीत. यासंदर्भात चर्चा होऊन आपण काहीतरी ठरवण्यापर्यंत जायला हवे.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी आपण याबाबत वन मंत्री यांच्यासोबत बोलतो, स्थानिक आणि धोरणात्मक प्रश्न वेगळे काढून दोन वेगवेगळ्या बैठका घेऊ असे म्हणून त्यांनी ताबडतोब सुटणारे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीतूनच पुणे विभागीय आयुक्तांना फोन करून दहा पंधरा दिवसात बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वन मंत्री यांच्याशीही संपर्क करून बैठक बोलवावी असे सांगितले.
जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री यांनी या प्रश्नी विशेष लक्ष घातल्याने वन हक्काचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता तयार झाली आहे. यावेळी अशोक आढाव, राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, किरण लोहकरे, शोभा कारंडे, नामदेव गंभीरे, मनीषा पाटील यांनीही अनेक सूचना मांडल्या. यावेळी प.महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर विभागातील पन्नास हुन अधिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

Sunday, June 8, 2025
रक्तदानमधून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची सामाजिक बांधिलकी; आजऱ्यात ७३ रक्तदात्यांनी बजावले कर्तव्य
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आजरा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष रामहरी राऊत आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाप्रमुख सौ. धनश्री देसाई यांनी सदर शिबिर आयोजित केले होते. मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सद्यस्थितीत रक्त तुटवडा पाहता कोणताही रुग्ण रक्ताविना वंचित राहू नये या उद्देशाने सदर शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७३ लोकांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन प्रशांत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजरा तालुकाप्रमुख सुरजित पांडव तर आजरा तालुकाप्रमुख (महिला आघाडी) सौ. उमा संकपाळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर आरोग्य शिबिरास वैभवलक्ष्मी रक्त केंद्र व आजरा डायग्नोसिन सेंटर सतीश पवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, रवळनाथ गॅस एजन्सीचे मानसिंग देसाई, हर्षवर्धन देसाई, रामचंद्र नाईक, अब्बास मुल्ला, सागर हरेर यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी रवी तळेवाडीकर, गौरव देशपांडे, नाथ देसाई, सामाजिक कार्यकर्त्या गीता पोतदार, माधुरी पाचवडेकर यांनी या रक्तदान शिबिर मध्ये उपस्थिती दर्शवली. या रक्तदान शिबिरास सर्व शिवसेना कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरास आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

राधानगरी तालुक्यातील आपटाळ पैकी कुदळवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
राधानगरी, विकास न्यूज नेटवर्क :
आपटाळ पैकी कुदळवाडी (ता. राधानगरी) येथे रविवारी सकाळी गव्याने केलेल्या हल्ल्यात ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भिकाजी गुंडू बेरकळ (वय ५९) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भिकाजी बेरकळ हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कडका येथील पाण्याच्या ठिकाणी गावाला पाणी सोडण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बेरकळ यांचा जागीच मृत्यू झाला.

Friday, June 6, 2025
9 जून रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या तक्रारींचे निरसन वेळेत व जलद गतीने होणे आवश्यक आहे. या उद्देशाने 100 दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि. 9 जून 2025) रोजी दुपारी 1 वाजता महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे महावितरण/ऊर्जा दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यांना महावितरण संबंधित योजनांसंदर्भात अडचणी व तक्रारी असतील त्यांनी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSee1kpO5xbIprTTvl7AB4DDpkftMx-Lk9CzyQNGOW8gl-N5LQ/viewform या संकेतस्थळावर रविवार दि. 8 जून 2025 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत आपले अर्ज दाखल करावेत, ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी महावितरणच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात दि. 8 जून 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन गणपत लटपटे, अधिक्षक अभियंता, महावितरण कोल्हापूर मंडल यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणची सहा विभागीय कार्यालये असून एकूण वीज ग्राहक संख्या 12.58 लाख इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणद्वारे घरगुती, औद्योगिक, व्यापारी, शेतीपंप व इतर ग्राहकांना वीजपुरवठा देऊन जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले जाते. महावितरणमध्ये सद्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा पॅनेलद्वारे विजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौरपंप देणे इत्यादी योजनांचा समावेश आहे. महावितरण दरबारमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली आहे.
===========

Thursday, June 5, 2025
‘गोकुळ’ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार; गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना सदिच्छा भेट
मुंबई, न्यूज नेटवर्क :
गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळ परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ व सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि संघाचे संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नाम.बाबासाहेब पाटील यांचा गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले कि, गोकुळ दूध संघ हा सहकार व दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था असून गोकुळने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. दुग्ध व्यवसायामध्ये तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असून गोकुळसारख्या संस्थांनी यामध्ये आघाडी घ्यावी. आम्ही शासनस्तरावर मागोवा घेऊन सहकार्य करू. दूध व्यवसायवाढीसाठी गोकुळला लागेल ती प्रत्येक मदत करण्यात येईल. गोकुळचा विस्तार म्हणजे शेतकऱ्यांचा विकास असे प्रतिपादन व्यक्त केले. या बैठकीत गोकुळच्या वतीने मुंबईतील एन.डी.डी.बी. (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) च्या जागेची मागणी ही या भेटीत करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा, शासनाकडून आवश्यक ती मदत नक्की केली जाईल. तसेच राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदानाबाबतही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनास हे अनुदान तत्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. तसेच दुग्ध व्यवसायात आधुनिकतेचा वापर वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसाय वाढीसंदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी गोकुळचे नूतन चेअरमन नविन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळचा उद्देश नेहमीच शेतकरी हित आणि संस्थेचा सक्षम विस्तार हा राहिला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

तालुका प्रशासनाने खरीप हंगामातील बी-बियाणे व खते प्रमाणित असलेबाबतची खात्री करण्याची आजरा तालुका शिवसेनेची मागणी
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुका प्रशासनाने खरीप हंगामातील बी-बियाणे व खते प्रमाणित असलेबाबतची खात्री करून आजरा तालुक्यातील कृषी सेवा दुकानदारांना विक्री करणेस परवानगी देण्याची मागणी आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये खरीप हंगाम चालू झाला असून, आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग बी-बियाणे व औषधे खरेदी करणेसाठी कृषी सेवा केंद्रावरती जात आहेत. बऱ्याच ठिकाणी यापूर्वी शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी करतेवेळी फसवणूक झाली आहे. त्याच बरोबर खते खरेदी करतेवेळी पण फसवणूक झाली आहे. काही दुकानदार शेतकऱ्यांना खतावरती लिंकिंग खते, अप्रमाणित असलेले बी-बियाणे मोठ्या प्रमाणात वारेमाप पैसे घेऊन मुक्त विक्री करत असलेबाबत शेतकरी वर्गातून आमच्या कार्यालयाकडे माहिती आलेली आहे. सदर बाब गंभीर असून आजरा तालुका प्रशासनाने कृषी विभाग आजरा व कृषी विभाग पंचायत समिती यांचे सोबत संयुक्तरित्या बैठक घेऊन तपासणी कामी भरारी पथक तयार करून शेतक-यांना प्रमाणित असलेली बि-बियाणे व खते योग्य दरात उपलब्ध करून देणेबाबत सूचित करावे. व जे कोणी भेसळ बि-बियाणे करतील व खतांवर लिंकिंग करतील त्यांच्या वरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आजरा तालुका प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, साळगाव सरपंच धनंजय पाटील, इंद्रजित देसाई, रणजित सरदेसाई, विजय कोंडूसकर, मंदार बिरजे, सुनील दिवेकर, युवराज पाटील, श्रीकांत कळेकर, सुशांत बुरुड यांच्या सह्या आहेत.

Subscribe to:
Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...