Thursday, June 5, 2025

तालुका प्रशासनाने खरीप हंगामातील बी-बियाणे व खते प्रमाणित असलेबाबतची खात्री करण्याची आजरा तालुका शिवसेनेची मागणी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुका प्रशासनाने खरीप हंगामातील बी-बियाणे व खते प्रमाणित असलेबाबतची खात्री करून आजरा तालुक्यातील कृषी सेवा दुकानदारांना विक्री करणेस परवानगी देण्याची मागणी आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये खरीप हंगाम चालू झाला असून, आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग बी-बियाणे व औषधे खरेदी करणेसाठी कृषी सेवा केंद्रावरती जात आहेत. बऱ्याच ठिकाणी यापूर्वी शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी करतेवेळी फसवणूक झाली आहे. त्याच बरोबर खते खरेदी करतेवेळी पण फसवणूक झाली आहे. काही दुकानदार शेतकऱ्यांना खतावरती लिंकिंग खते, अप्रमाणित असलेले बी-बियाणे मोठ्या प्रमाणात वारेमाप पैसे घेऊन मुक्त विक्री करत असलेबाबत शेतकरी वर्गातून आमच्या कार्यालयाकडे माहिती आलेली आहे. सदर बाब गंभीर असून आजरा तालुका प्रशासनाने कृषी विभाग आजरा व कृषी विभाग पंचायत समिती यांचे सोबत संयुक्तरित्या बैठक घेऊन तपासणी कामी भरारी पथक तयार करून शेतक-यांना प्रमाणित असलेली बि-बियाणे व खते योग्य दरात उपलब्ध करून देणेबाबत सूचित करावे. व जे कोणी भेसळ बि-बियाणे करतील व खतांवर लिंकिंग करतील त्यांच्या वरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आजरा तालुका प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, साळगाव सरपंच धनंजय पाटील, इंद्रजित देसाई, रणजित सरदेसाई, विजय कोंडूसकर, मंदार बिरजे, सुनील दिवेकर, युवराज पाटील, श्रीकांत कळेकर, सुशांत बुरुड यांच्या सह्या आहेत.
======================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...