कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाचे वरिष्ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाली. या मिटिंगमध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना, म्हैस दुधाच्या संकलन वाढीच्या संधी व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गोकुळच्या चेअरमनपदी निवड झालेलेबद्दल नविद मुश्रीफ यांचा संघाच्या अधिकारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा म्हैस दुधासाठी राज्यभर ओळखला जातो. म्हैस दुधाची बाजारपेठ अधिक व्यापक असून दुधाची मागणी जास्त आहे. त्यामुळे म्हैस दुधाचे संकलन वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोकुळच्या जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच दूध उत्पादकांसाठी असलेल्या गोकुळच्या विविध योजना भविष्यात अधिक प्रभावीपणे राबविणार असून जिल्ह्यातील व सीमा भागातील जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. ज्यामुळे भविष्यात वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट साध्य होईल असे मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, दुग्ध व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, आहार नियोजन व दर्जेदार पशुखाद्याचा वापर महत्वाचा आहे. तसेच संघाच्या विविध योजना, फर्टीमीन प्लस या मिनरल मिक्स्चरचा व महालक्ष्मी पशुखाद्याचा नियमित वापर, आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त करावा यासाठी संकलन व पशुसंवर्धन, पशुखाद्य विभागामार्फत दूध उत्पादकांचे प्रबोधन करावे असे आवाहन केले.
या मिटिंगमध्ये दूध संकलनातील घट वाढ, कार्यक्षेत्रातील व बाहेरील दूध संकलन वाढीसाठी विविध उपायोजना, दुधाची गुणवत्ता, पशुसंवर्धन विभाग, पशुखाद्य विभाग, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन, संघाच्या विविध योजनांची अंमलबजावणीची गती वाढवणे या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी यांनी संकलन विभागाच्या सर्व अडचणी व संधी यांचा आढावा घेत उपाययोजना सुचविल्या. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले तर आभार संचालक किसन चौगले यांनी मानले. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संघाचे अधिकारी अनिल चौधरी, अरविंद जोशी, शरद तुरंबेकर, डॉ.प्रकाश साळुंके, व्ही.डी.पाटील, दत्तात्रय वाघरे संघाचे अधिकारी व सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते.
======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment