Saturday, March 26, 2022

*उन्हाळ्यात पाण्यात भिजवून ‘शेंगदाणे' खा, निरोगी आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर*


*उन्हाळ्यात पाण्यात भिजवून ‘शेंगदाणे' खा, निरोगी आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर*


हिवाळ्यात शेंगदाणे खाणे फायदेशीर असते असे सांगितले जाते, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांतही कच्चे शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात भाजलेल्या शेंगदाण्याऐवजी कच्चे शेंगदाणे पाण्यात भिजवून किंवा उकळवून खाल्ल्यास अनेक समस्यांवर मात करता येते. भिजवलेल्या शेंगदाण्यांच्या सेवनाने लठ्ठपणा, अशक्तपणा दूर होतो. तसेच गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांवर मात करता येते. भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा, अशक्तपणा आदी समस्या दूर होतातच, शिवाय हृदयालाही ठेच लागते. जाणून घेऊया उन्हाळ्यात भिजवलेले कच्चे शेंगदाणे खाण्याचे काय फायदे..

 *ह्रदयाचे आरोग्य सुधारते* 

कच्चे शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. ह्रदय निरोगी राहायला मदत होते. ह्रदयाच्या निरोगी आरोग्यासाठी पाण्यात भिजवून ठेवलेले कच्चे शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते.

 *सांधेदुखीवर गुणकारी* 

रात्री पाण्यात भिजत घातलेले शेंगदाणे सकाळी खाल्ले तर सांधेदुखी, कंबरदुखी दूर व्हायला मदत होते. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असते. यामुळे या विकारांनी त्रस्त असलेल्यांनी हा प्रयोग करून पाहावा.

 *कर्करोगापासून संरक्षण* 

कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवलेल्या कच्च्या शेंगदाण्यांचा उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात समावेश करा. शेंगदाण्यांमध्ये अँण्टीऑक्सीडंट्स आणि पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या आजारांकरिता कच्चे शेंगदाणे खाणे गुणकारी ठरते.

 *स्नायूंच्या मजबुतीकरिता* 

उन्हाळ्यात कच्च्या भिजवलेल्या शेंगदाण्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास स्नायूदुखी दूर होते. स्नायूंचे आरोग्य सुधारते. स्नायूंना टोनिंग करण्यासाठीही कच्चे शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे.

 *अॅसिडिटीपासून सुटका* 

उन्हाळ्यात अॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर भिजवलेले शेंगदाणे खा. शेंगदाण्यामधील पोटॅशियम, कॉपर, कॅल्शियम, मॅगनीज, आयर्न इत्यादी पोषक घटकांमुळे पोटाशी निगडीत आजार दूर व्हायला मदत होते. अपचनाच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.

 *मधुमेहावर गुणकारी* 

भिजवलेले आणि कच्चे शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. त्यामुळे मधुमेही कच्च्या भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन करू शकतात, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या पदार्थाचा आहारात समावेश करावा.

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...