Monday, March 28, 2022

भारतात कुठे आहे सोने? कसे काढले जाते खाणीतून सोने? जाणून घ्या.....


🌟 भारतात कुठे आहे सोने? कसे काढले जाते खाणीतून सोने? जाणून घ्या.....

≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛
✎ भारतात सोन्याचे किती साठे आहेत?  
केंद्रीय खनिजकर्म उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सोन्याच्या खाणीत एकूण  ७०.१  टन इतके सोने आहे. यापैकी सर्वात जास्त सोने म्हणजे तब्बल ८८ टक्के  सोने हे एकट्या कर्नाटकातील खाणींत आहे, तर आंध्र प्रदेशात १२ टक्के आणि झारखंडमध्ये ०.१ टन सोने आहे. कर्नाटकातील रायचूरमध्ये हट्टी गोल्ड माइनमध्ये सर्वप्रथम १९४७ साली सोन्याचे उत्खनन सुरू झाले. तेव्हापासून २०२० पर्यंत या खाणीतून एकूण ८४ टन सोन्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, यातील उत्पादनाचा वेग तुलनेने अत्यल्प म्हणजे केवळ १.९ टन इतकाच आहे. 

जगात वर्षाकाठी होणाऱ्या सोने खरेदीमध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण जागतिक सोने खरेदीच्या  ५७ टक्के खरेदी केली जाते.  भारतीयांच्या घरात असलेल्या सोन्याचा अंदाजित आकडा हा २२ हजार ५०० टन इतका असून, त्याची किंमत १ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या घरात आहे. २०२१ च्या आर्थिक वर्षात भारतात अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची आयात झाली. रुपयांत २.५ या आकड्यावर पुढे किमान १४ शून्य लागतात. २०२० या वर्षामध्ये भारतात एकूण ४४६.४० मेट्रिक इतक्या भरभक्कम सोन्याची खरेदी झाली. सोने आपल्यापर्यंत अत्यंत चकचकीत स्वरूपात येते. मात्र, आपल्यापर्यंत येणाऱ्या सोन्याचा प्रवास मात्र क्लिष्ट आहे.भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत तपासणी झाली आणि एखाद्या जागी सोन्याचे साठे सापडल्यावर, ती जागा अधिग्रहित करण्यापासून सोने निर्मितीचा प्रवास सुरू होतो. एकदा ही जागा ताब्यात आली की, सर्वप्रथम तिथे मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. सोने असे वरवर मिळत नाही, तर त्याकरिता भूगर्भात किमान साडेतीन किलोमीटर आतपर्यंत शिरावे लागते. तिथंवर शिरल्यानंतर, ज्या खडकांमध्ये सोने लपले आहे ते खडक दिसू लागतात. ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने हे खडक फोडले जातात आणि ते ट्रॉलीच्या माध्यमातून जमिनीपर्यंत पाठविले जातात. जमिनीवर आलेले खडक नजीकच्याच प्रकल्पात नेऊन त्याचे क्रशिंग होते. अर्थात, या खडकांचे अत्यंत बारीक तुकडे केले जातात. क्रशिंग केल्यानंतर सायनाइड आणि कार्बन यांच्या मिश्रणात हे खडक भिजविले जातात. या दोन्ही रसायनांमध्ये दगड पूर्णतः वितळतो आणि कार्बनचे कवच धारण करत कच्चे सोने दिसू लागते.या प्रक्रियेनंतर अत्युच्य तापमानात हे कच्चे सोने वितळविले जाते आणि यातून कार्बन उडून जातानाच, शुद्ध सोन्याचे चकाकते रूप डोळ्यांना दिसू लागते. सोन्याची शुद्धता ही या पातळीवर ठरते. किती सर्वोच्च तापमानाला सोने वितळविले आहे आणि त्यातून किती टक्के शुद्धता मिळू शकते, हे तेव्हा समजते. सरासरी ९९.५ टक्के शुद्धतेपर्यंत सोने गाळण्याचा उच्चांक जगात प्राप्त झालेला आहे. गाळलेल्या सोन्यातून मिळालेले बारीक सोनेरी कण हे पुढे उत्पादन प्रकल्पात पाठविले जातात आणि तिथे बाजारपेठेच्या मागणीनुसार, त्याची वीट, बिस्किटे, चीप अशी बांधणी होते आणि तिथून मग हे सोने खुल्या बाजारात आपल्यापर्यंत विक्रीसाठी येते.   
⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...