Sunday, March 6, 2022

कलिंगड कापल्याशिवाय (कापायच्या आधी) ते गोड आणि तयार आहे की नाही हे कसे ओळखावे...????


🤔🍉🤔🍉🤔🍉🤔

➖➖➖➖➖➖➖
_*☑ कलिंगड कापल्याशिवाय (कापायच्या आधी) ते गोड आणि तयार आहे की नाही हे कसे ओळखावे...????*_
➖➖➖➖➖➖➖

आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय... या दिवसात मार्केट मध्ये भरपूर कलिंगडे आलेली असतात... बऱ्याच वेळेस दिसायला छान आणि हिरवे कलिंगड बघून न कापता आपण घरी घेऊन जातो... आणि ते पांढरे निघते... पण ते गोड आणि तयार निघावे या साठी काही परीक्षण आडाखे आहेत...  या द्वारे आपण स्वतः आपल्याला गोड आणि तयार कलिंगड शोधू शकतो....
🔲🔲🔲

*📍आडाखा नं.१: शेतात जमिनीवर टेकलेल्या भागावरील कलंगडाचा बदललेला रंग.... -* कलिंगड व्यवस्तीत पिकला आहे कि नाही याचा अंदाज वरील फोटो वरून लावू शकता. कलिंगड ज्या ठिकाणी जमिनीवर टेकून वाढलेले असते, त्या भागाला ‘फील्ड स्पॉट’ म्हटले जाते. तो कलिंगडाचा भाग पिवळा किंवा केशरी रंगाचा दिसून येतो. जर कलिंगड पिकून तयार असले, तर हा भाग पिवळट केशरी रंगाचा दिसतो हे कलिंगड गोड असते... आणि जर कलिंगड तयार नसेल तर हा भाग पांढरा दिसतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना आधी फील्ड स्पॉटचा रंग पाहण्यास विसरू नये. अर्थात कलिंगड पिवळसर केशरी स्पॉट बघूनच खरेदी करावा, पांढरा स्पॉट असलेले फळ पूर्ण पिकलेले नसते. हिरवेगार कलिंगड कधीच पुरेपूर पिकलेले नसते, जास्त पिवळसर केशरी दिसते ते चवीला हिरव्या, पांढऱ्या किंवा फिकट पिवळ्या पेक्षा अधिक गोड लागेल.

*📍आडाखा नं २: कलिंगडावरील जाळ्या-* कलिंगड घेतांना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोत दाखविल्याप्रमाणे एखाद्या कलिंगडाच्या सालीवर भुरकट रंगाच्या जाळ्या दिसून येतात. मुख्य म्हणजे, कलिंगडावरील या जाळ्या हे दर्शवतात की मधमाश्यांनी फळाला किती स्पर्श केलेला आहे. जितका मधमाश्यांचा स्पर्श अधिक तितकी अधिक भुरकट जाळी फळावर दिसून येते, आणि जितके भुरकट डाग अधिक, तितके कलिंगड चवीला अधिक गोड असे हे एकंदर गणित आहे.

*📍आडाखा नं ३: कलिंगडाच्या आकार -* कलिंगडात नर आणि मादी असे दोन प्रकार असतात, कलिंगड जर मोठे आणि लंबगोल आकाराचे असेल, तर ते नर कलिंगड असते यात पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे हे गोडीला थोडे कमी असते... मादी कलिंगड मात्र आकाराने गोल गरगरीत असून हे चवीला गोड असते. त्यामुळे आकार निवडताना कलिंगड जास्त मोठे किंवा छोटे न घेता मध्यम आकाराचे आणि गोल गरगरीत पाहून घ्यावे.....

*📍आडाखा नं ४: कलिंगडाचा देठ... -* कलिंगड निवडताना त्याचा देठ पाहून घ्यावे. कलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली असेल आणि देठ पूर्णपणे वाळलेला असेल तर ते फळ खाण्यास तयार आहे असे समजावे. पण जर कलिंगडाचा देठ हिरवा असेल, तर हे कलिंगड पिकण्याआधीच तोडले गेले आहे आणि ते गोड तर अजिबात लागणार नाही असे समजावे. एकदा वेलीवरून तोडलेले कलिंगड पिकत नाही. त्यामुळे कलिंगड निवडताना देठ पूर्ण वाळलेले कलिंगड निवडावे...

*📍आडाखा नं ५: वजन आणि आवाज...-* कलिंगड घेताना ते पहिल्यांदा उचलून पहावे, हातात घेतल्यावर ते वजनाने जड लागत असेल तर जा ते कापल्यावर गोड असण्याची शक्यता जास्त. हलके कलिंगड कधीही घेऊ नये. शिवाय कलिंगड चारी बाजूंनी थोपटून सौम्य फटका मारून पहावे. जर 'बदबद' असा काहीसा पोकळ भासल्यासारखा प्रतिध्वनी सम आवाज आला तर समजा कलिंगड पिकले आहे. कच्चे असल्यास धातूच्या भरीव वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो. तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.

➖➖➖➖➖➖➖
🤔🍉🤔🍉🤔🍉🤔

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...