आजरा (प्रतिनिधी) :
सध्या सर्वत्र कोरोनोचा हाहाकार असल्याने लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा देखील लागू करण्यात आला आहे. यामुळे जमावाने फिरणे, गप्पा मारणे किंवा विनाकारण एकत्र येणे गुन्हा ठरतो. असे असताना देखील मुंगुसवाडी (ता. आजरा) येथील १५ तरूण गणेश देव नावाच्या शेतात चक्क क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र जमले. सामना ऐन रंगात आला असताना बॉलीग करण्याच्या कारणावरून तरूणात वाद झाला. अन् हा वाद थेट आजरा पोलिसात पोहचला. यानंतर पोलीसांनी वादाचे खरे कारण क्रिकेट असल्याचे शोधून काढले. यातून क्रिकेट खेळणार्या १५ युवकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच सदर १५ युवकांना १४ दिवस होम क्वाँरटाईन करण्यात आले आहे. या एकाच बॉलवर १५ जण आऊट झाल्याच्या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया
7410168989
😊😂
ReplyDelete😜😜😜😜😜☝️
ReplyDelete