Wednesday, April 29, 2020

आकुर्डेच्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह; भुदरगड तालुक्यात खळबळ

 

गारगोटी (प्रतिनिधी) :

आकुर्डे (ता. भुदरगड) येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ झाली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे चालक म्हणून काम करते. सावंतवाडी तालुक्यातील रूग्ण घेऊन तो आला होता. १६ एप्रिल रोजी त्याला कडगाव (ता. भुदरगड) आरोग्य केंद्रात त्याला क्वांरटाईन केले होते. पण १४ दिवस पुर्ण होण्याआधीच त्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला. रात्री दीड वाजता सदर व्यक्तीला सीपीआरच्या विशेष कक्षात दाखल करण्यात आले.


बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...