कोल्हापूर (प्रतिनिधी) :
मुंबईहून हैदराबादकडे निघालेल्या तरूणाला कोल्हापूरात अडविण्यात आले. सदर तरूणाची कोरोनाची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल बुधवारी (दि. २९) रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. हा युवक २५ वर्षीय आहे. त्याचे मूळगाव हैदराबाद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ झाली आहे. जिल्हाबंदी असल्याने सदर युवक ट्रकने मुंबईहून हैदराबादला जाणार होता. मात्र तो प्रथम ट्रकने रत्नागिरीला गेला. तेथून कोल्हापूर मार्गे हैदराबादला जाणार होता. मात्र रत्नागिरीहून कोल्हापूरात येत असताना सदर युवकाला सोमवार (दि. २७) रोजी पोलीसांनी ताब्यात घेतला. त्याची तपासणी करून मंगळवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. जिल्हाबंदी असतानाही अवैध प्रवास करणार्या अनेकांना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. आतापर्यंत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सदर हैदराबादचा युवक तसेच कर्नाटक हसन शहराकडे जाणार्या कंटेनरमधील दोघांचा समावेश आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment