Sunday, April 19, 2020

अमेरिका एक-एक नागरिकाच्या मृत्यूचा बदला घेणार?; ट्रम्प यांची चीनला धमकी


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) :

कोरोना व्हायरसप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनना खुले आव्हान दिले आहे. कोरोना जाणिपूर्वक पसरवला असेल चर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प म्हणाले आहेत. शनिवारी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. जर ही चूक असेल तर चूक ही चूक असते. पण कोरोना जर जाणिवपूर्वक पसरवला असेल तर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील.

शनिवारी व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जर ते (चीन) जाणूनबुजून हा विषाणू पसरवण्यास जबाबदार असल्याचे समोर आले तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. १९१७ नंतर कोणीच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी म्हटले की, कोविड-१९ जगभरात पसरण्यापूर्वी चीनबरोबर आमचे संबंध चांगले होते. परंतु, या प्रकारामुळे आता खूप फरक पडला आहे. चीनवर आपण नाराजही असल्याचे त्यांनी सांगितले.

वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे समोर आणले. यानंतर चीनवर जगभरातून टीका होत आहे. चीनने जाहीर केलेले मृतांचे आकडे पारदर्शक नसल्याचे सांगत ट्रम्प आणि त्यांचे ज्येष्ठ सहकाऱ्यांनी टीका केली. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येवर देखील ट्रम्प यांनी शंका घेतली.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रत्येकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जगात सर्वांत मोठी आमची अर्थव्यवस्था होती. चीन आमच्या आसपासही नव्हता, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, इराण आधीपेक्षा एक अत्यंत वेगळा देश झाला आहे. पूर्वी इराण पश्चिम आशियावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आता तो फक्त जगू इच्छितो, अशा शब्दांत अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...